---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेची घोषणा, कर्णधाराने सोडलं नेतृत्व, संघाला मोठा धक्का

IND vs SL
---Advertisement---

यंदाच्या टी-20 विश्वचषकात काही संघांच्या खराब कामगिरीमुळे गोंधळ झाला होता. या यादीत पाकिस्तान संघ पहिल्या स्थानावर आहे. मात्र खराब कामगिरीचा मोठा परिणाम श्रीलंकेवरही दिसून आला. प्रशिक्षकानंतर आता कर्णधारानेही भारताच्या आगमनापूर्वी राजीनामा दिला आहे. प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरहूड यांनी 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर आपले पद सोडले. आता वानिंदू हसरंगानेही टी20 फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडले आहे.

श्रीलंका क्रिकेटने वानिंदू हसरंगाने कर्णधारपद सोडल्याची पुष्टी केली आहे. संघाच्या हितासाठी वानिंदू हसरंगाने कर्णधारपद सोडल्याचे बोर्डाने म्हटले आहे. मात्र, तो खेळाडू म्हणून संघाशी जोडला जाईल. हसरंगाला संघाचा कणा म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. भारताविरुद्धच्या टी20 मालिकेत तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू असेल. बाॅलसह बॅटनेही संघासाठी योगदान देण्याची क्षमता हसरंगाकडे आहे. मात्र, टी20 विश्वचषकात हसरंगाची कामगिरी निराशाजनक होती.

कर्णधारपद सोडण्याबाबत वानिंदू हसरंगा म्हणाला, एक खेळाडू या नात्याने मी श्रीलंकेसाठी नेहमीच सर्वोत्तम प्रयत्न करेन आणि मी नेहमीप्रमाणेच माझ्या संघाला आणि नेतृत्वाला पाठिंबा देईन आणि त्यांच्या पाठीशी उभा राहीन.” हसरंगाचा राजीनामा स्वीकारला असल्याचे एसएलसीने म्हटले आहे. एसएलसीने म्हटले आहे, “श्रीलंका क्रिकेटने त्यांचा राजीनामा स्वीकारला. आमच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्लॅन्समध्ये हसरंगा आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू राहील. भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी श्रीलंकेने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. आता भारताविरुद्धच्या मालिकेत संघाची धुरा कोणाकडे जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेला 26 जुलैपासून सुरुवात होत आहे. टी20 मालिका पल्लेकेले येथे खेळवली जाणार आहे. यानंतर कोलंबो येथे होणाऱ्या दोन्ही संघांमध्ये 3 वनडे सामनेही खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयने संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. लवकरच दोन्ही देश संघाची घोषणा करतील.

महत्तवाच्या बातम्या-

चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ का नाही जाणार पाकिस्तानमध्ये? पाहा नेमकं कारण..
हे काय, कार्यकाळ सुरु होण्यापूर्वीच बिनसलं? बीसीसीआयने हेड कोच गंभीरच्या दोन्ही अटी फेटाळल्या
आग, आक्रमकता आणि प्रेम…, गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या ‘डीजे’ने काय म्हटले?

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---