मार्च महिन्यात भारताने जिंकलेल्या निदहास ट्रॉफीच्या विजयाचा शिल्पकार दिनेश कार्तिक गेले काही महिने सतत चर्चेत आहे.
निदहास ट्रॉफी आणि 2018 च्या आपीएलमध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे कार्तिकला पुन्हा एकदा इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
2004 साली आंतरराष्ट्ररीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कार्तिक कामगिरीत सातत्य नसल्याने भारतीय संघात अजूनही आपले स्थान पक्के करु शकला नाही.
नुकतेच ब्रेक फास्ट विथ चॅंम्पियन या कार्यक्रमात दिनेश कार्तिकने आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमात दिनेश कार्तिकने आपले संघ सहकारी रोहीत शर्मा आणि हार्दिक पंड्याबद्दलची त्याची मते व्यक्त केली.
याचबरोबर कार्तिकने भारताचा माजी कर्णधारा सौरव गांगुली सोबत 2004 साली घडलेल्या धक्कादाय घटनेचा उलगडा केला.
काय म्हणाला कार्तिक गांगुली बद्दल-
2004 साली भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा कार्तिक सदस्य होता. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्या दरम्यान पाकिस्तानचा गडी बाद झाल्यावर कार्तिक भारतीय खेळाडूंसाठी मैदानात पाणी घेऊन गेला होता.
त्यावेळी कार्तिकचा तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीला चुकून धक्का लागला होता.
“ये कौन हैं, कहासे पकडके लाते हो?” त्यावेळी गांगुली कार्तिककडे बघत म्हणाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-एकवेळ चालवत होता पाणीपुरीचा गाडा आता थेट भेटला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला
-तिसरी टी२० गाजवलेले दोन भारतीय सेहवागकडून ट्रोल