भारताचा माजी क्रिकेटपटू आणि स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग सोशल मि़डीयावर कायमच अॅक्टीव असतो. जवळपास पंधरा वर्षे क्रिकेटचे मैदान गाजवलेला सेहवाग आता आपल्या हटके ट्विटने सोशल मिडिया गाजवतोय.
रविवारी ( 8 जुलै) भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धचा तिसरा टी-20 सामना जिंकून टी-20 मालिका खिशात घातली.
भारताच्या या विजयात सलामीवीर रोहित शर्माने नाबाद शतक झळकावत भारतीय संघाला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. त्याने 56 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 101 धावा केल्या.
तर अष्टपैलू हार्दिक पंड्याने इंग्लंडचे चार फलंदाज तंबूत धाडत इंग्लंडला 200 धावसंख्येच्या आत रोखले. तर फलंदाजी करताना पंड्याने 14 चेंडूत 33 धावांची वादळी खेळी केली.
याच्याच आधार घेत विरेंद्र सेहवागने इंग्लंड संघाला डवचत रोहित आणि हार्दिक पंड्याला मजेशीर शुभेच्छा दिल्या.
“इंग्लंड हम शर्मिंदा है, टॅलेंट अभी जिंदा है. रोहित, तिसऱ्या सामन्यात क्लिन हिटींग करत तू उत्कृष्ठ शतक साजरे केले. कुंग फू पांड्या तू तर दोन्ही बॉल आणि बॅटने चांगली कामगिरी केलीस.” आपल्या ट्विटमध्ये सेहवाग म्हणाला.
England ham sharminda hain,
Talent abhi Zinda hai.@ImRo45 , what elegance and clean hitting. 3rd T20I 100, many more to come. Great effort from Kungfu Pandya with both bat and ball. Well deserved series win.
#IndvsEng pic.twitter.com/Mut6O2dLX7— Virender Sehwag (@virendersehwag) July 8, 2018
साऱ्या क्रिकेट विश्वात नाव कमावलेला रोहित शर्मा त्याच्या फलंदाजीत सातत्य नसल्याने कायमच त्याच्या क्रिकेटमधील क्षमतेबद्दल ट्रोल होत असतो. तर हार्दिक पांड्या त्याचे मैदानावरील चपळ क्षेत्ररक्षण व स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. त्याला सेहवागनेच कुंग फू पांड्या हे नाव दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-हार्दिक पंड्याचा भिमपराक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
-सचिन म्हटला १९व्या ओव्हरमध्येच टीम इंडिया जिंकणार आणि झालेही तसेच…





