ब्रीस्टल येथिल कौंटी क्रिकेट मैदानावर झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव केला.
या विजयाबरोबर भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका जिंकली.
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २० षटकात १९९ धावांचे बलाढ्य आव्हान दिले होते.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या सामन्या दरम्यान भारतीय संघ फलंदाजीस येण्यापूर्वीच भारत हा सामना १९ षटकांच्या आधीच जिंकणार असे भाकित ट्विटर वर वर्तवले होते.
I feel India will wrap up the match before the 19th over. Do you all agree? #ENGvIND
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 8, 2018
अखेर भारतीय संघाने रोहित शर्माच्या १०१ धावा व कोहली ४३ आणि हार्दिक पांड्याच्या ३३ धावांच्या सहाय्याने १८.४ षटकातच हा सामना जिंकत मास्टर ब्लास्टर सचिनचे भाकित खरे ठरवले.
या विजयानंतर सचिनने ट्विट करत रोहित शर्माच्या खेळीचे कौतूक करत त्याचे भाकित खरे ठरवल्याबद्दल रोहितचे आभार मानले.
Such clean hitting by @ImRo45!!
This innings was a pure joy to watch. Hope this form translates to the ODIs. (Thanks for helping my 19th over prediction come true! ????) pic.twitter.com/xZnyAFm1Sj— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 8, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-असा विक्रम करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय!
-हार्दिक पंड्याचा भिमपराक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय






