पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी लवकरच पिता होणार आहे. आफ्रिदी आणि त्याची पत्नी अंशा आपल्या पहिल्या अपत्याची वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांचे लग्न झाले होते. अंशा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी आहे. पाकिस्तान कसोटी संघाचे नवे प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी याला पुष्टी दिली आहे. मुलाच्या जन्मामुळे शाहीन आफ्रिदी बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता असल्याचे गिलेस्पीने सांगितले. शाहीन आफ्रिदी आणि अंशाचे लग्न फेब्रुवारीमध्ये तर रिसेप्शन पार्टी सप्टेंबरमध्ये झाली होती. 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानला बांग्लादेशचे यजमानपद भूषवायचे आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 21 ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे.
पाकिस्तान कसोटी संघाचे ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जेसन गिलेस्पी म्हणाले, ‘मुलाच्या जन्मामुळे शाहीन आफ्रिदी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेला खेळू शकतो. आम्ही त्याला सांगितले आहे की जर त्याला या काळात पत्नीसोबत राहायचे असेल तर तो ब्रेक घेऊ शकतो. शाहीन आफ्रिदी नुकतीच आपल्या गैरवर्तनामुळे चर्चेत आली होती. प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या अहवालात मोहम्मद युसूफसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. टी-20 विश्वचषकापूर्वी इंग्लंड दौऱ्यात त्याने युसूफसोबत चांगले वर्तन केले नाही.
बाबर आझमच्या कर्णधार पदाच्या निवृत्तीनंतर शाहीन आफ्रिदीला टी20 संघाचे कर्णधार केले होते. बाबरने एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील पाकिस्तानच्या खराब कामगिरीमुळे कर्णधारपद सोडले होते. अफ्रिदीने न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत संघाचे नेतृत्व केले होते. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डने टी20 विश्वचषक 2024 च्या आधी शाहिनकडून संघाचे कर्णधारपद काढून बाबर आझमला दिले. तर पीसीबीने टी2. विश्वचषकाआधी शाहिन आफ्रिदीला उपकर्णधारपद होण्यासाठी ऑफर दिले होते पण वेगवान गोलंदाजाने याला नकार दिला.
टी20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी फारच खराब होती. बाबर आझमच्या नेतत्तृवाखालील संघाने लाैकिकास साजेल अशी कामगिरी केली नाही. साखळी सामन्यात आधी अमेरिका संघाकडून तर नंतर भारताकडून संघाचे लाजिरवाणे पराभव झाले. या पराभवामुळे संघ टी20 विश्वचषकाच्या साखळी फेरीतूनच बाहेर पडला. आश्या परिस्थितीत बाबर आझमच्या कर्णधारपदावर टांगती तलवार आहे. माजी क्रिकेटपटूंशी चर्चा केल्यानंतरच बाबरला कर्णधारपदावर कायम ठेवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे पीसीबीचे म्हणणे आहे. कोण आहे शाहीन आफ्रिदीची पत्नी अंशा, हा पाक गोलंदाज होणार आहे बाप, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून बाहेर!
महत्तवाच्या बातम्या-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रथमच 4 नवीन खेळांचा समावेश, उद्घाटन समारंभही असेल खास
सायना नेहवालबाबत अवमानकारक वक्तव्य भारी पडलं, युवा क्रिकेटपटूला मागावी लागली माफी
एकदा-दोनदा नव्हे, पाकिस्तानात अनेकवेळा झाला आहे भारतीय खेळाडूंवर हल्ला