---Advertisement---

घे बाबा रुमाल आणि खेळ! हसन अली आणि बाबार आझमचा मजेशीर व्हिडिओ होतोय व्हायरल

On: गुरूवार, जून 17, 2021 1:17 AM
---Advertisement---

पाकिस्तान सुपर लीग 2020 च्या 22 व्या सामन्यामध्ये इस्लामाबाद युनायटेडने कराची किंग्सला 8 विकेट्सने पराभूत केले. इस्लामाबाद संघाकडून इफ्तिकार अहमदने उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान, या सामन्यातील एक मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

बाबर आजम आणि हसन अली यांचा गमतीशीर व्हिडिओ व्हायरल
कराची किंग्सच्या फलंदाजीदरम्यान इस्लामाबादचा वेगवान गोलंदाज हसन अली कराची संघाचा फलंदाज बाबर आजम सोबत मस्ती करताना दिसून आला. या दरम्यान हसन अलीने बाबर आजम सोबत अशी गोष्ट केली ज्यामुळे कोणाचेच हसू थांबणार नाही.

असे झाले की, डावाच्या 17 व्या षटकादरम्यान बाबर आजमचा फलंदाजी करताना रुमाल खाली पडला. त्यानंतर हसन गोलंदाजी न करता स्वत: बाबरकडे गेला आणि पडलेला रुमाल उचलून बाबर अझमच्या टी-शर्टमध्ये घातला. हसनने हे गमतीत केले. बाबर अझमनेही हसन अलीच्या वागणुकीवर हसायला सुरू केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

https://twitter.com/Danitweets__/status/1404490759269662732

संघातील या खेळाडूंनी खेळी उत्कृष्ट कामगिरी
या सामन्यात कराची किंग्सने प्रथम फलंदाजी केली. त्यांच्याकडून बाबर अझमने 54 चेंडू मध्ये 81 धावा केल्या. यामध्ये 7 चौकार आणि 3 षटकाराचा समावेश होता. त्यामुळे कराची किंग्सने पहिले फलंदाजी करत 4 बाद 190 धावा केल्या.

त्यानंतर इस्लामाबाद युनायटेडच्या संघाने 191 धावांचा पाठलाग 18.4 षटकांत केवळ २ गडी गमावून पूर्ण केला. त्यांच्याकडून इफ्तिकारने नाबाद 71 धावा बनविल्या. इफ्तिकारला सामनावीराचा किताब मिळाला आहे. त्याने अर्धशतकी खेळी दरम्यान 39 चेंडूमध्ये 5 षटकार आणि 5 चौकार इफ्तिकारने लगावले. इफ्तिकार अहमदच्या तुफानी 71 धावा व्यतिरिक्त कोलिन मुनरोने 56 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 88 धावांची नाबाद खेळी खेळली. कराची किंग्जकडून वकास मकसूद आणि अब्बास आफ्रिदी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

लईच भारी! जेव्ह पती विराटला आपल्यासाठी गाणं म्हणताना भावूक झाली होती अनुष्का शर्मा, व्हिडिओ होतोय व्हायरल

न्यूझीलंडने २०१९ विश्वचषक जिंकला असता तर ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतली असती निवृत्ती

भारत वि इंग्लंड महिला कसोटी: भारतीय फिरकीपटूंनी विणले फिरकीचे जाळे, स्नेह राणा ठरली ‘सरप्राईज पॅकेज’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---