2018-2019 च्या मोसमापासून रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत बीसीसीआयने ९ नविन संघाचा समावेश केला आहे.
यामध्ये मेघालय, मनिपूर, मिझोराम, सिक्किम, नागालॅन्ड, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पाॅंडेचरी हे संघ रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण करणार आहेत.
तर तब्बल वीस वर्षांच्या बंदीनंतर 2018-2019 च्या रणजी मोसमात बिहारचा संघ पुनरागमन करणार आहे.
लोढा समितीच्या शिफारसीनुसार प्रत्येक राज्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या समितीने हा निर्णय घेतला आहे.
या नऊ संघांचा रणजी स्पर्धेत समावेश झाल्याने आता स्पर्धेतील एकून संघांची संख्या 37 होणार आहे.
गेल्या मोसमापर्यंत ही स्पर्धा 28 संघ चार गटात खेळवली जायची. प्रत्येक गटात 7 संघ असायचे. प्रत्येक गटातील दोन अव्वल संघाना पुढे बाद फेरीत प्रवेश मिळायचा.
या स्पर्धेत नऊ नवीन संघांचा समावेश झाल्याने स्पर्धेची व्याप्ती वाढणार आहे. तसेच स्पर्धेचे स्वरुपही बदलणार आहे.
2018-19 च्या मोसमासाठी देशांतर्गत क्रिकेटमधील संघांच्या क्रमवारीनुसार ‘अ’ आणि ‘ब’ गटात तर नवीन संघांना ‘क’ आणि ‘ड’ गटात विभागण्यात येणार आहे.
तसेच नवीन संघांकडे मैदानांची उपल्ब्धता कमी असल्याने मैदानांचा प्रश्न बीसीसीआय समोर उभा राहणार आहे.
2018-2019चा रणजी मोसम आॅक्टोबर महिन्यापासून सुर होणार आहे. स्पर्धेतील वाढलेल्या संघांच्या संख्येमुळे हा मोसम जानेवारी 2019 पर्यंत लांबणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जगाला हेवा वाटावा असे क्रिकेट पुनरागमन स्टिव्ह स्मिथने करुन दाखवले!
टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी गोष्ट, मोठा खेळाडू करतोय पुनरागमन