बीसीसीआयच्या एका ट्विटमुळे रोहित शर्मा आयपीएलमधून माघार घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. रविवारी पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान रोहितला दुखापत झाली होती.
‘बीसीसीआयची मेडिकल टीम रोहित शर्मा व इशांत शर्माच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे’, असा ट्विट केल्यामुळे रोहितच्या आयपीएल माघारीबद्दल या चर्चा रंगू लागल्या आहेत. यातच भर म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय संघात रोहितची निवडही करण्यात आलेली नाही. यामुळे रोहितची दुखापत गंभीर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“हे खूप दुर्दैवी आहे की रोहित आयपीएलमध्ये भाग घेणार नाही. तो भारतात परत जाणार असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काही दाखल होईल. तेथे तो दुखापतीतून सावरण्यासाठी काम करेल,” असे एका बीसीसीआय सुत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला सांगितले.
“२०२१ विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचा मर्यादीत षटकांचा विकेटकीपर म्हणून राहुलला पहिली पसंती असणार आहे.त्याने त्याच्या नेतृत्त्वगुणानेही सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याचमुळे त्याला संघाचा उपकर्णधार केले आहे, ” असे बीसीसीआय सुत्रांनी सांगितले.
रोहित भारतीय वनडे व टी२० संघाचा उपकर्णधार असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवड करताना उपकर्णधारपदाची धुरा केएल राहुलकडे सोपविण्यात आली आहे. तसेच वनडे, टी२० व कसोटी संघात रोहितचा समावेश करण्यात आला नाही. या मालिकेसाठी बराच काळ बाकी असूनही रोहितचा समावेश झालेला नाही. त्यामुळे तो आयपीएलमध्ये न खेळण्याची शक्यता जास्त असल्याचे बोलले जात आहे.
असे जर झाले तर मुंबईला ४ वेळा विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार संघातून बाहेर होईल व सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रोहित दुखापतग्रस्त झाल्यामुळे दोन सामन्यात पोलार्डनेच मुंबईच्या कर्णधारपदाची कमान सांभाळली आहे.
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेट- कीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद. सिराज
वाचा-
-वनडे, टी२० संघातून रिषभ पंतला डच्चू, या दोघांना मिळाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विकेटकीपर म्हणून संधी
-टीम इंडियाचा उपकर्णधार झाला ‘हा’ खेळाडू, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घेतली रोहितची जागा
– ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; पाहा टी-२०, वनडे आणि कसोटी संघाची संपुर्ण यादी