जागतिक क्रिकेट इतिहासाचा अभ्यास केल्यास आपल्याला अनेक महान दिग्गज खेळाडूंचा उल्लेख करावा लागेल ज्यांनी या खेळासाठी अपार योगदान दिले आहे. मग तुम्ही त्यात सर डॉन ब्रॅडमन घ्या, ब्रायन लारा घ्या, सुनील गावस्कर घ्या, अॅलन बॉर्डर घ्या, विवीयन रिचर्ड घ्या, रीची बेनाॅ घ्या किंवा सचिन तेंडुलकर.अजून असे बरेच महान दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी हा खेळ जपला, वाढवला आणि सर्वदूर पसरवला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या महान खेळाडूंचा सर्वोत्तम संघ निवडणे, हे अतिशय जिकिरीचे आणि अवघड काम होऊन बसते. परंतु हे आव्हान स्विकारून विविध क्रिकेट विश्लेषक किंवा खेळाडूदेखील आपला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम संघ निवडत असतात.
पाकिस्तानचा माजी दिग्गज शाहिद आफ्रिदीनेदेखील आपल्या आवडीचा सर्वोत्तम क्रिकेट संघ निवडला आहे. पाकिस्तानच्या या माजी कर्णधाराने लॉर्ड्स क्रिकेट मैदानाच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर स्वतःच्या आवडीचे 11 खेळाडू निवडले आहेत. आपल्या सर्वोत्तम 11 खेळाडूंत त्याने पाकिस्तानच्या तब्बल 5 खेळाडूंना स्थान दिले आहे तर ऑस्ट्रेलिया संघाच्या 4 खेळाडूंना जागा दिली आहे.
भारतीय संघाच्या एकमात्र सचिन तेंडुलकरच नाव त्याने या अंतिम 11 खेळाडूंमध्ये घेतले आहे. पाकिस्तानतर्फे सईद अन्वर, इंजमाम उल हक, राशिद लतीफ, वसीम अक्रम आणि शोएब अख्तर यांना त्याने आपली पसंती दिली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या ॲडम गिलख्रिस्ट, रिकी पोंटिंग, ग्लॅन मॅग्रा, आणि दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नला स्थान दिले आहे. वेगवान गोलंदाजी आक्रमणात आफ्रिदीने वसीम अक्रम आणि शोएब अख्तर यांच्या जोडीला ग्लॅन मॅग्राला सामील केले आहे. तसेच संघात शेन वॉर्नला एकमेव फिरकीपटू म्हणून स्थान मिळाले आहे.
शाहिद आफ्रिदीची कारकीर्द
आफ्रिदीने 2018 सालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेतला आहे. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 27 कसोटी, 398 एकदिवसीय आणि 99 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीला आफ्रिदी फलंदाज म्हणून ओळखला जात असे, परंतु नंतर त्याने आपल्या गोलंदाजीतही कमाल विरोधी फलंदाजांना हैराण करून सोडले होते. यामुळेच त्याने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 98 बळी आणि एकदिवसीय सामन्यांत तब्बल 395 बळी टिपले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
ना स्मिथ, ना कमिन्स! टीम पेनच्या मते हा खेळाडू असेल ऑस्ट्रेलियाचा पुढील कर्णधार
WTC फायनलमध्ये या दोन खेळाडूंना एकत्र खेळतांना पाहण्याची व्हीव्हीएस लक्ष्मण यांची इच्छा
अशी असेल ईशांतची WTC फायनलमध्ये रणनिती, स्वतः केला खुलासा