भारताची स्टार फलंदाज स्म्रीती मानधना ने बिग बॅश लीगनंतर इंग्लंडमधील किया सुपर लीगमध्ये धमाकेदार आगमन केले आहे.
वेस्टर्न स्टॉर्म संघाकडून किया सुपर लीगमधील आपला पहिला सामना खेळत असलेल्या स्म्रीतीने 20 चेंडूत 48 धावांची तुफानी खेळी केली. आपल्या संघाला यॉर्कशायर डायमंड विरुद्ध विजय मिळवून दिला.
आपल्या 48 धावांच्या खेळीत स्म्रीतीने 3 चौकार आणि 5 षटकार मारले.
याबरोबर किया सुपर लीगमधील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा स्म्रीतीचा विक्रम थोडक्यात हुकला. यापूर्वी किया सुपर लीगमध्ये सर्वात जलद अर्धशतक 22 चेंडूत झाले आहे. स्म्रीतीकडे या सामन्यात हा विक्रम मोडण्याची संधी होती मात्र ती 20 व्या चेंडूवर 48 वर बाद झाली.
What an incredible innings on KSL debut from Smriti Mandhana! 48 from just 20 balls!
Some amazing shots here! 💥💥#StormTroopers 🌪️ 🌪 @mandhana_smriti @sachin_rt @BCCIWomen @Anya_shrubsole @legsidelizzy @ECB_cricket @SGanguly99 @VVSLaxman281 @harbhajan_singh pic.twitter.com/JW2dkDzw6C
— Western Storm (@_WesternStorm) July 22, 2018
यामध्ये यॉर्कशायर डायमंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात पाच गडी गमावून 162 धावा केल्या.
या 162 धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या वेस्टर्न स्टॉर्मने हे आव्हान 15.3 षटकात पूर्ण केले. यामध्ये 41 आणि हेथर नाईटने 97 धावांचे योगदान दिले.
हेथर नाईटने आपल्या 97 धावांच्या खेळीत 13 चौकार आणि 5 षटकार मारले.
महत्त्वाच्या बातम्या-
-भुवनेश्वर कुमार नसला तरी भारतीय संघाला फरक पडणार नाही- झहीर खान