---Advertisement---

सीएसकेविरुद्ध आरआरच्या विजयी शिल्पकाराला दक्षिण आफ्रिकेने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळले, मिलरही दुर्लक्षित

On: बुधवार, एप्रिल 1, 2026 2:43 PM
---Advertisement---

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी (३१ मार्च) २०२६-२७ हंगामासाठी महिला आणि पुरूष या दोन्ही संघांच्या केंद्रीय करारांची यादी जाहीर केली. यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पुरुष संघामध्ये १८ खेळाडूंसोबत एक संकरित (हायब्रीड) करार असलेला खेळाडूही आहे. या यादीतून अनेक चकित करणारे नावे वगळली आहेत. त्यामध्ये डेविड मिलर आणि नांद्रे बर्गर यांचा समावेश आहे.

ज्या खेळाडूंना यामध्ये संधी दिली आहे, त्यांच्यासाठी आणि संघासाठी हा हंगाम अतिशय महत्वाचा आहे. कारण दक्षिण आफ्रिकेत आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२७ स्पर्धा खेळली जाणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने खेळाडूंना करारबद्ध केले आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज ओटनील बार्टमन आणि अष्टपैलू कॉर्बिन बॉश यांचा समावेश असून त्यांचा हा पहिलाच राष्ट्रीय करार आहे.

त्याचबरोबर मॅथ्यू ब्रेट्झके आणि डेवाल्ड ब्रेविस यांनाही त्यांचा पहिला पूर्ण राष्ट्रीय करार मिळाला आहे. अनुभवी फिरकीपटू सायमन हार्मरला या हंगामासाठी हायब्रीड करार देण्यात आला आहे.

बर्गर आणि जेराल्ड कोएट्झी यांना दुखापतीमुळे दुर्लक्ष केले आहे. यावरून काहीही करा, मात्र दुखापत टाळा नाहीतर करार मिळणार नाही, असेच या दोघांसोबत घडले आहे. तसेच क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने मिलर, रस्सी वॅन डर डुसेन आणि रिजा हेंड्रिक्स यांनाही करारातून वगळले आहे. दक्षिण आफ्रिकेने मागील वर्षी एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या केंद्रीय करारानंतर बर्गरने ९ वनडे आणि ६ टी२० सामने खेळले होते. कोएट्झीने आठ टी२० सामने खेळले होते.

बर्गरने सुरू असलेल्या आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सोमवारी (३० मार्च) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध प्रभावी गोलंदाजी केली. त्याने संजू सॅमसन, आयुष म्हात्रे यांच्या विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकात २६ धावा देत २ विकेट्स घेतल्या आणि सामनावीराचा पुरस्कारही जिंकला.

दक्षिण आफ्रिकेने करारबद्द केलेले खेळाडू – टेम्बा बावुमा, डेव्हिड बेडिंगहॅम, ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी झोर्झी, मार्को जॅनसेन, केशव महाराज, क्वेना माफाका, एडेन मार्कराम, विआन मुल्डर, सेनूरान मुथुस्वामी, लुंगी एनगिडी, कगिसो रबाडा, रायन रिकल्टन, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन.

संकरित (हायब्रीड) करार – सायमन हार्मर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---