येत्या काही दिवसात युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. तसेच सर्व संघांनी आपला १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ देखील जाहीर केला आहे. दरम्यान श्रीलंका क्रिकेट बोर्डाने देखील रविवारी (१२ सप्टेंबर) टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंका संघाचे नेतृत्वपद दासून शनाकाच्या हाती सोपवले आहे. तर संघातील मुख्य फलंदाज धनंजय डी सिल्वाला संघाचे उप-कर्णधारपद देण्यात आले आहे. नुकत्याच भारतीय संघाविरुद्ध झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत दासुन शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघाने अप्रतिम कामगिरी करत टी२० मालिकेत भारतीय संघाला पराभूत केले होते.
तसेच श्रीलंका क्रिकेटने जाहीर केलेल्या १५ सदस्यीय खेळाडूंच्या संघात फिरकीपटू वानिंदू हसरंगा आणि दुश्मंता चमिराला संधी दिली आहे. या दोघांनी भारतीय संघाविरुद्ध विजय मिळवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यातही वानिंदू हसरंगाने भारतीय खेळाडूंच्या अडचणीत वाढ केली होती. त्याने गोलंदाजी करताना एकूण ३ सामन्यात ७ गडी बाद केले होते. तसेच फलंदाजीमध्येही त्याने मोलाचे योगदान दिले होते. याच कामगिरीची दखल घेत, त्याला इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात स्थान देण्यात आले आहे. याखेरीज ४ राखीव खेळाडूंना देखील संधी देण्यात आली आहे.
Your 🇱🇰 squad for the ICC Men's #T20WorldCup 2021! 👊https://t.co/xQbf0kgr6X pic.twitter.com/8Hoqbx10Vy
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 12, 2021
या खेळाडूंना नाही मिळाले संघात स्थान
या संघातून काही बड्या खेळाडूंना वगळण्यात आले आहे, ज्यामध्ये निरोशन डिकवेला, कुशल मेंडिस सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. यासह दानुष्का गुनातीलकाला देखील या संघात स्थान देण्यात आले नाहीये. तसेच कुशल परेरा दुखापतीमुळे संघाबाहेर असल्यामुळे, मिनोद भानुकाला यष्टिरक्षकाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.(Cricket Srilanka announced squad for upcoming T-20 world cup 2021)
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे श्रीलंका संघ – दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा (उप-कर्णधार), कुशल परेरा, दिनेश चंडीमल, अविष्का फर्नांडो, बी राजापक्षा, सी असालंगा, वानिंदु हसरंगा, कामिंडु मेंडिस, सी. करूणारत्ने, एन. प्रदीप, दुश्मंथा चामीरा, पी. जयाविक्रामा, एल. माडुशांका, एम थीकशाना.
राखीव खेळाडू – लाहिरू कुमारा, बिनुरू फर्नांडो, अकिला धनंजय, पुलिना थरंगा
महत्त्वाच्या बातम्या-
तुम्ही त्यांना दोषी ठरवू शकत नाही; ‘त्या’ प्रकरणावरुन भारतीय दिग्गजाचा विराट-शास्त्री यांना पाठिंबा
आयपीएल तोंडावर असताना उसळला नवा वाद, ‘या’ कारणामुळे फ्रँचायझींचे बीसीसीआयला पत्र
नेमके बीसीसीआयने धोनीला टीम इंडियाचा मार्गदर्शक का बनवले? ‘माही’च्या सर्वात मोठ्या प्रशंसकाचाच सवाल