मार्चमध्ये दक्षिण अफ्रिका कसोटी मालिकेत बॉल टेंम्परींगबद्दल शिक्षा झालेला माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथने कॅनडा येथील ग्लोबल टी-२० लीगमधून क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे.
ग्लोबल टी-२० लीगच्या सलामीच्या सामन्यात टोरंटो नॅशनल्सकडून खेळताना ६१ धावांची खेळी करत व्हॅनेक्युअर नाईट्स संघावर विजय मिळवण्यात त्याने मोलाचा वाटा ऊचलला.
व्हॅनेक्युअर नाईट्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात २२७ धावा केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करण्या उतरलेल्या टोरंटो नॅशनल्सने १९.४ षटकाट हे आव्हान न्युझीलंडचा अॅस्टोन डेवीच नाबाद ९३ आणि स्मिथच्या ६१ धावांच्या मोबदल्यात सहज पार केले.
पहिल्या २५ चेंडूत जेमतेम २९ धावा करणाऱ्या स्मिथने नंतर मात्र गेअर बदलला. पुढच्या १६ चेंडूत तुफानी फटकेबाजी करत त्याने ३२ धावा केल्या. या सामन्यात स्मिथने ८ चौकार आणि १ षटकाराची बरसात केली. तसेच ख्रिस गेलचा अप्रतिम झेलही टिपला.
मार्च महिन्यानंतर पहिल्यांदाचा स्पर्धात्मक क्रिकेट खेळणाऱ्या स्मिथला आपल्या पहिल्याच सामन्यात चांगला सुर गवसला आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दरम्यान बॉल टेंम्परींग प्रकरणात स्मिथचा सहभाग अढळल्याने त्याच्यावर आणि डेव्हीड वार्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास बंदी घातली आहे.
मात्र स्मिथ आणि वार्नरला जगभरातील लीग क्रिकेटमध्ये सहभागी होण्याची मुभा देण्यात आली आहे.
या ग्लोबल टी-२० लीगमध्ये स्मिथवबरोबर वार्नरही सहभागी झाला आहे. या लीगमध्ये वार्नर विनिपेग्स हॉक्स संघाकडून खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी गोष्ट, मोठा खेळाडू करतोय पुनरागमन
-कॅप्टन कूल धोनीच्या नावावर जगातील सर्वात कूल विक्रम!