रविवार दि. 24 जून रोजी झालेल्या ‘मन की बात’ या कर्यक्रमात मोदींनी अजिंक्य रहाणेचे विशेष कौतुक केले.
14 जूनला बेंगलोर येथे भारत-अफगाणिस्तान यांच्यात ऐतिहासिक कसोटी सामना पार पडला या पार्शभूमीवर मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“मला आशा आहे की भविष्यातही भारत-अफगाणिस्तान चांगल्या खेळ भावनेने खेळतील. तसेच अजिंक्य रहाणेने सामना जिंकल्यानंतर विजयी ट्रॉफी बरोबर फोटो काढायला अफगाणिस्तान संघाला बोलावल्याचा क्षण मी कायम लक्षात ठेवीन. यातून भारतीय संघाच्या खेळ भावनेचे दर्शन होते.” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने विजयी चषकाबरोबर फोटो काढण्यासाठी अफगाणिस्तान संघाला देखील पुढे बोलवले होते.
अजिंक्य राहणेच्या या कृतीने त्याने जगभरातील अनेक क्रिडा रसिकांची वाहवा मिळवली.
या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
भारतीय संघाने या सामन्यात नवख्या अफगाणिस्तानचा दोन दिवसातच सहज पराभव केला.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली या सामन्यात नसल्याने अजिंक्य राहणेने कर्णधारपद भूषवले होते.
महत्वाच्या बातम्या-
-सचिन म्हणतो, हा आहे भारतीय संघातील सर्वात जबरदस्त गोलंदाज
-आयसीसी महिला टी२० विश्वचषक२०१८ च्या वेळापत्रकाची घोषणा