---Advertisement---

Ranji Trophy 2024 । रियान पराग ठरला वन मॅन आर्मी! कर्णधाराचे संघासाठी सलग दुसरे शतक

On: रविवार, जानेवारी 14, 2024 7:26 PM
Riyan Parag
---Advertisement---

सध्या रणजी ट्रॉफी 2024 हंगाम सुरू आहे. हंगामातील दुसरा सामना आसाम आणि केरळ संग एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. केरळणे या सामन्यातील पहिल्या डावात मोठी धावसंख्या केली. सोबतच आसामच्या पहिल्या तीन विकेट्स स्वस्तात घेतल्या. असे असले तरी, कर्णधार रियाम पराग याने आसाम संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम केले. रियानने हंगामातील सलग दुसऱ्या डावात शतकी खेळी केली आहे. 

रियान पराग () याने रणजी ट्रॉफी 2024 च्या पहिल्याच सामन्यात छत्तीसगड संघाविरुद्ध शतकी खेळी केली. हे रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक होते. रियानच्या नेतृत्वात आसाम संघ सध्या केरळविरुद्ध हंगामातील आपला दुसरा सामना खेळत आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात केरळने 419 धावा केल्या. प्रत्युत्तरात आसामने तिसऱ्या दिवसाखेर 7 विकेट्सच्या नुकसानावर 231 धावा केल्या. सध्या आसाम संघ 188 धावांनी मागे आहे. यात रियानने 125 चेंडूत 116 धावांची सर्वोत्तम खेळी केली. सुरेश विश्वेश्वर याने टाकलेल्या 49व्या षटकात रियान पराग पायचीत झाला. पण त्याच्या शतकी खेळीमुळे आसाम संघ फॉलो ऑन टाळू शकला.

रणजी ट्रॉफीच्या पहिल्या हंगामात आसामला छत्तीसगडकडून फॉलो ऑन मिळाला होता. या सामन्यातील पहिल्या डावात रियान अवघ्या 8 धावा करून बाद झाला होता. पण दुसऱ्या डावात त्याने 155 धावांची वादळी खेळी केली. या धावा त्याने 11 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीने अवघ्या 87 चेंडूत केल्या. असे असले तरी, हंगामातील पहिल्या सामन्यात आसामला पराभव स्वीकारावा लागला.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये रियान राजस्तान रॉयल्स संघाचा भाग आहे. पण अष्टपैलू खेळाडूला आयपीएलमध्ये अद्याप स्वतःची गुणवत्ता सिद्ध करता आली नाहीये. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र त्याची बॅट अनेकदाला तळवली आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 54 सामने खेळले असून यात त्याचा सरासरी अवघ्या 16.22 धावांची राहिली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याला 600 धावा करता आल्या आहेत.

देशांतर्गत क्रिकेटमधील त्याचे आकडे मात्र अप्रतिम आहेत. 26 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत 1583 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 34.41 राहिली आहे, तर स्ट्राईक रेट 66.93 इतका आहे. रविवारी त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपेल तिसरे शतक झळकावले. लीस्ट एक क्रिकेटमध्ये त्याने 49 सामन्यांमध्ये 1720, तर देशांतर्गत टी-20 मध्ये 98 सामन्यात 2043 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
NZ vs PAK । कर्णधार विलियम्सनला पुन्हा दुखापत, न्यूझीलंड संघ आणि चाहत्यांच वाढलं टेंशन
IPLच्या पहिल्या हंगामातील ऑरेंज कॅप विजेत्या मार्शचा क्रिकेटला अलविदा, आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वीच माजवली होती खळबळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---