सोशल मिडीयावर कायमच सक्रिय असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रविवार दि. 24 जूनला भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवल्याबद्दल ट्वीट करून अभिनंदन केले.
मात्र या ट्विटमध्ये सचिनने एक मोठी चूक केली होती.
“भारतीय हॉकी संघासाठी हा विकेंड चांगला गेला. पाकिस्तान नंतर भारतीय संघाने अर्जेंटीनाला पराभूत केले. मी या खास क्षणी सरदार सिंगने त्याच्या 300 व्या सामन्यात गोल केल्याबद्दल विशेष अभिनंदन करतो.” असे सचिन पहिल्या ट्विटमध्ये म्हणाला.
मात्र या सामन्यात सरदार सिंगने गोल केला नव्हता. सचिनच्या लक्षात हि चूक आल्यानंतर त्याने ते ट्विट डीलीट केले.
नंतर सचिनने आपली चुक दुरुस्त करत नविन ट्विट केले.
त्यामध्ये तो म्हणाला, “भारतीय हॉकी संघासाठी हा विकेंड चांगला होता. कालच्या विजयानंतर आज अर्जेंटीनाला पराभूत केले. भारतासाठी 300 वा सामना खेळल्याबद्दल सरदार सिंगचे विशेष आभार.”
Fantastic weekend for the @TheHockeyIndia team beating Argentina after a stellar win yesterday. Special mention to @imsardarsingh8 on playing his 300th game for India! #ChampionsTrophy. #INDvARG pic.twitter.com/zH5sZfT464
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 25, 2018
रविवार दि. 24 जूनला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अर्जेंटीनाचा 2-1 अशा फरकाने पराभव केला.
भारत, पाकिस्तान, अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, बेल्जिअम आणि नेदरलँन्ड्स असे सहा संघ या चॅम्पीयन्स ट्रॉफीत सहभागी झाले आहेत.
गुणतक्त्यात सध्या भारतीय संघ दोन सामन्यातील दोन विजयांसह अव्वल स्थानी आहे. भारताचा पुढचा सामना 27 जूनला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-त्यावेळी विराट घाबरला होता; सौरव गांगुलीचे कोहलीबद्दल मोठे वक्तव्य
-टॉप ४: इंग्लंड विरुद्ध वनडेत ४ क्रमांकावर हे खेळाडू करु शकतात फलंदाजी