पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि संघाचा वरिष्ठ खेळाडू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
सोमवार दि. 25 जूनला शोएब मलिकने 2019 साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले आहे.
टी-20 क्रिकेटसाठी फिटनेस चांगली असल्याने तो टी-20 क्रिकेट खेळणे चालू ठेवणार आहे.
“इंग्लंडमध्ये होणारी 2019 ची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ही माझ्या कारकिर्दितली 50 षटकांची शेवटची स्पर्धा असेल. जर शरीराने साथ दिली तर टी-20 क्रिकेट खेळत राहणार आहे.” असे शोएब मलिक पत्रकार परीषदेत म्हणाला.
2007 च्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान संघ पहिल्याच फेरीतून बाहेर पडल्यानंतर मलिककडे पाकिस्तान संघाचे कर्णधारपद आले.
मलिकने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये 56 सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व केले. त्यामध्ये पाकिस्तानला 36 विजय आणि 18 पराभव झाले.
शोएब मलिकने 1999 साली वेस्ट इंडीज विरुद्ध शारजहा येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
शोएब मलिक पाकिस्तानकडून आजपर्यंत 261 एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 35.05 च्या सरासरीने 6975 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतके आणि 41 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने गोलंदाजी करत 154 बळीसुद्धा मिळवले आहेत.
शोएब मलिकने यापूर्वी 2015 साली कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. तो पाकिस्तान तर्फे 35 कसोटी सामने खेळला आहे. त्यामध्ये 35.15 च्या सरासरीने 1898 धावा केल्या आहेत.
खेळाडू ज्यांनी २००० पुर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि आजही क्रिकेट खेळत आहेत-
हरभजन सिंग- २५ मार्च १९९८ (वय- ३७)
ख्रिस गेल- ११ सप्टेंबर १९९९ (वय- ३८)
रंगाना हेराथ- २२ सप्टेंबर १९९९ (वय- ४०)
युवराज सिंग- ०३ ऑक्टोबर २००० (वय- ३६)
शोएब मालिक -१४ ऑक्टोबर १९९९ (वय- ३६)
मार्लन सॅम्युएल- ०४ ऑक्टोबर २००० (वय- ३७)
महत्त्वाच्या बातम्या-
-हा खेळाडू म्हणतो….धोनीपेक्षा जाॅश बटलर लई भारी!
-होय, मास्टर ब्लास्टर सचिन चुकला…..