येत्या बुधवारपासून (1 ऑगस्ट) भारत इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरवात होत आहे.
यापूर्वी चेम्सफोर्ड येथे 25 ते 27 जुलै या दरम्यान भारताचा एसेक्स कौंटी संघाविरुद्ध झालेला तीन दिवसीय सराव सामना अनिर्णीत राहीला आहे.
या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांबरोबर गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी करत भारत कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.
या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ क्षेत्ररक्षणास येताना चाहत्यांनी ढोल वाजवत स्वागत केले.
यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर शिखर धवनने या ढोलांच्या तालावर भांगडा नृत्य करत असंख्य चाहत्यांची मनं जिंकली.
Two @BCCI players have enjoyed their time at Chelmsford!
Well played, @imVkohli & @SDhawan25! 👏👏👏#ESSvIND pic.twitter.com/Uz8W7p2xoh
— Essex Cricket (@EssexCricket) July 27, 2018
या सामन्यात कर्णधार कोहलीने पहिल्या डावात 68 धावांची अर्धशतकी खेळी करत कसोटी मालिकेत चांगली कमागिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचे दाखवून दिले.
तर सामन्याच्या दोन्ही डावात शून्यावर बाद झालेल्या शिखर धवनचा फॉर्म भारतासाठी चिंतेची बाब ठरणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-मार्टिन गप्टीलने केला टी२० मधील मोठा कारनामा
-माजी दिग्गज प्रशिक्षक म्हणतो, ब्रॉड-अँडरसन जोडी वाजवणार टीम इंडियाचा बॅंड