चेम्सफोर्ड | बुधवारी (२५ जुलै) कौंटी क्रिकेट मैदानावर भारत वि. एसेक्स यांच्यात तीन दिवसीय सराव सामना सुरु झाला आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ८४ षटकात ६ बाद ३२२ धावा केल्या होत्या.
यावेळी दिनेश कार्तिक नाबाद ८२ आणि हार्दिक पंड्या नाबाद ३३ धावा करत खेळत होते.
या सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या जेव्हा मैदानावर फलंदाजीसाठी आले, तेव्हा त्यांचे स्थानिक भारतीय चाहत्यांनी भांगडा नृत्य करत स्वागत केले.
याबद्दल बीसीसीआयने ट्विट करुन माहिती दिली.
The two batters make their way to the ground with a traditional welcome by the locals.#ESSvIND pic.twitter.com/uqqPt9pOvl
— BCCI (@BCCI) July 26, 2018
जगभरात असंख्य चाहते असणाऱ्या टीम इंडियाला इंग्लंडमध्ये देखिल चाहत्यांची कमी नाही. या प्रसंगावरुन आपल्याला याची प्रचिती येते.
या सराव सामन्याचा दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव सर्वबाद ३९५ धावांवर आटोपला. तर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा एसेक्सने ५ बाद २३७ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-टाॅप ५- इम्रान खानबद्दल या ५ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
-वाचा- कोहली, धोनी आणि सचिनमध्ये कोण ठरले सर्वाधिक लोकप्रिय?