---Advertisement---

टीम इंडियासाठी खुशखबर! दोन महत्त्वाचे गोलंदाज सराव सामन्यात चमकले

On: शुक्रवार, जुलै 27, 2018 10:16 AM
---Advertisement---

चेम्सफोर्ड | बुधवारी (२५ जुलै) कौंटी क्रिकेट मैदानावर भारत वि. एसेक्स यांच्यात तीन दिवसीय सराव सामना सुरु झाला आहे.

या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ८४ षटकात ६ बाद ३२२ धावा केल्या होत्या.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ  ६ बाद ३२२ धावांमध्ये अवघ्या ७३ धावांची भर घालून ऑलआउट झाला.

त्यानंतर फलंदाजीस आलेल्या एसेक्स कौंटी संघाने दुसऱ्या दिवशी ५ बाद २३७ धावा केल्या होत्या.

यामध्ये मायकेल पॅपरचे ६८ आणि कर्णधार टॉम वेस्टलीनेचे ५७ धावांचे योगदान आहे.

भारताकडून गोलंजादी इशांत शर्मा आणि उमेश यादवने अप्रतीम गोलंदाजी करत प्रत्येकी दोन बळी मिळवले आहेत.

तर कसोटी पदार्पणाच्या प्रतिक्षेत असलेल्या शार्दूल ठाकूरने एक बळी मिळवला.

आज सामन्याचा तिसरा  दिवस आहे. यामध्ये एसेक्स  संघ १८५ धावांनी पिछाडीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भारतीय फलंदाजांचे भांगडा नृत्य करत चाहत्यांनी केले स्वागत

-विश्वचषकानंतर ‘स्टेन गन’ थंडावणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment