आजचा संडे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी सुपर ठरणार आहे. कारण आजचा दिवस क्रिकेटच्या दुहेरी पर्वणीने सजला आहे. एका दिवसात दोन मोठ्या सामन्यांचे थरार भारतीय क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहेत.
पहिला सामना हा महिला टी-20 विश्वचषकातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. भारत-पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील प्रत्येक सामना हा नेहमीच खूप उत्सुकतेने पाहिला जातो. क्रिकेटप्रेमींना या सामन्याची नेहमीच मोठी उत्सुकता असते. या सामन्यात भारतीय संघाकडून कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे.
पाकिस्तानच्या संघाबद्दल बोलायचं झाल्यास मागील सामन्यात संघाने श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे. तर टीम इंडियाला मागील सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. यासोबतच दुसरा सामना टी-20 मालिकेत भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत असून, त्यांच्या नेतृत्वाखालील हा पहिला सामना आहे. युवा खेळाडूंना या मालिकेतून संधी मिळणार आहे. ज्यामुळे संघाच्या भविष्यातील खेळाडूंना आपली कौशल्ये दाखवण्यासाठी चांगली संधी आहे.
या सुपर संडेला क्रिकेट चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा ठेवा उलगडणार आहे. दुपारी भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार आणि संध्याकाळी भारत-बांगलादेश मालिकेचा रोमांच, या दुहेरी मजेत चाहत्यांचा रविवार खास होणार आहे.
हेही वाचा :
पहिल्या टी20 मध्ये भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? पिच रिपोर्ट आणि सामन्याचा अंदाज जाणून घ्या
MS Dhoni : आयपीएल 2025 मध्ये एमएस धोनी खेळणार का? मोठे अपडेट समोर
IND vs BAN; “भारताला पराभूत करण्यात आम्ही…” टी20 मालिकेपू्र्वीच बांगलादेशच्या खेळाडूचे मोठे वक्तव्य!