टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ भिडणार आहेत. हा सामना आज (29 जून) रोजी होणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष्य आजच्या सामन्यावर असणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्यास रात्री 8 वाजता सुरुवात होईल. दरम्यान या सामन्यापूर्वी टीम इंडियाला बॉलीवूडमधून विजयाबद्दल आगाऊ अभिनंदन करण्यात आले आहे. अभिनेता सोनू सूदने टीम इंडियाला आगाऊ शुभेच्छा दिल्या.
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना क्रिकेटमध्ये रस आहे. टीम इंडिया जेव्हाही कोणत्याही स्पर्धेचा अंतिम सामना खेळते तेव्हा बॉलिवूडमधून अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळतात. जर आपण सोनू सूदबद्दल बोललो तर तो अनेकदा भारतीय क्रिकेट संघाबद्दल काही ना काही बोलतांना दिसतो. तो अनेकदा भारतीय खेळाडूंनाही भेटत असतो. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचे आगाऊ अभिनंदन करताना त्याने ‘X’ वर लिहिले, “टीम इंडियाचे आगाऊ अभिनंदन. विश्वचषक आमचा आहे.“
Congratulations team India in advance 🤞
World Cup is ours🤩 #TeamIndia #IndiavsSouthAfrica @cricketworldcup @ICC— sonu sood (@SonuSood) June 29, 2024
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने यंदाच्या टी20 विश्वचषकात शानदार कामगिरी केली आहे. स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा आपल्या तिन्ही विभागात उल्लेखनीय प्रदर्शन राहिले आहे. टीम इंडियाने यंदाच्या विश्वचषकातील सर्व सामने जिंकली आहेत. साखळी सामन्यातील 4 पेकी 3 सामने जिंकले आहेत. तर कॅमडा विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. सेमी फायनमध्ये टीम इंडियाने इंगलंड संघाला 68 धावांनी धूळ चारुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ आतापर्यंत एकही सामना गमावला नाही. पहिल्या सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानाचा धुव्वा उडवून आफ्रिका संघ फायनलमध्ये धडक मारली होती.
महत्तवाच्या बातम्या-
आता वर्ल्डकप आपलाच…!!! ‘पनौती’ म्हणून ओळख असलेल्या सेलिब्रेटीचा दक्षिण आफ्रिकेला सपोर्ट
…तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची फायनल ठरू शकते विराट कोहलीच्या टी20 करिअरची अखेरची मॅच!
“काहीही झालं तरी विजय…” फायनलपूर्वी आफ्रिकेचा कर्णधार मार्करमनं दिला टीम इंडियाला इशारा