भारत आणि कॅनडा यांच्यात शनिवारी संध्याकाळी फ्लोरिडा येथील लॉडरहिलमध्ये सामना रंगणार आहे. यासाठी टीम इंडिया फ्लोरिडाला पोहोचली आहे. पण येथे पोहचताच भारताचा सराव सामना रद्द झाला. फ्लोरिडामध्ये सध्या हवामान खूपच खराब आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला आहे. ज्यामुळे टीम इंडियाचा सराव सामना रद्द करण्यात आला आहे. 2024 च्या टी20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा हा शेवटचा साखळी सामना आहे. यानंतर भारतीय संघ सुपर 8 मधील सामने खेळणार आहे.
बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. भारतीय संघ फ्लोरिडाला पोहोचल्याची माहिती बोर्डाने दिली. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, फ्लोरिडाला पोहोचल्यानंतर भारताचे सराव सत्र रद्द करण्यात आले आहे. टीम इंडियाचे सराव सत्र शुक्रवारी होणार होते. मात्र खराब हवामानामुळे ते रद्द करावे लागले. मियामीमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. यासोबतच लॉडरहिल परिसरालाही फटका बसला आहे. भारताला येथेच कॅनडाविरुद्ध सामना खेळायचा आहे.
New York ✅#TeamIndia arrive in Florida 🛬 for their last group-stage match of the #T20WorldCup! 👍 pic.twitter.com/vstsaBbAQx
— BCCI (@BCCI) June 14, 2024
टीम इंडियाने टी20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात संघाने आयर्लंडचा पराभव केला होता. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळवला. आणि शेवटच्या सामन्यात भारताने अमेरिकेचा 7 गडी राखून पराभव केला. आता टीम इंडियाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध आहे. शनिवारी रात्री भारत आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार आहे.
यासेबतच भारतीय संघाचे सुपर-8 मधील वेळापत्रक निश्चित झाले आहे. पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. तर 22 जून रोजी बांग्लादेश सोबत तर 24 जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना रंगणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
कोण वीरेंद्र सेहवाग…? शाकिब अल हसनचे वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल
भारतीय संघास धक्का! सुपर-8 फेरी पूर्वी टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू मायदेशी परतणार
पापुआ न्यू गिनीविरुद्ध अफगाणिस्तानचा शानदार विजय, सुपर-8 मध्ये मिळाला प्रवेश!