शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील विश्वविजेता भारतीय संघ झिम्बाब्वे दाैरा करत आहे. ज्यामध्ये टीम इंडिया 5 टी20 सामने खेळत आहे. यानंतर भारतीय संघाला श्रीलंकेचा दाैरा करायचा आहे. या दाैऱ्यासाठी भारतीय संघाच्या घोषणा करण्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. श्रीलंका दाैऱ्यावर भारतीय संघ 3 एकदिवसीय सामने आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ज्याची सुरुवात 27 जुलै पासून होणार असून 7 ऑगस्ट रोजी शेवटचा सामना खेळवला जाईल.
श्रीलंका दाैऱ्यावर 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यासाठी खेळाल्या जाण्याऱ्या भारतीय संघाची घोषणा लवकरच होणार आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्त अहवलानुसार निवड समितीची पुढील आठवड्यात संघाच्या निवडीसाठी बैठक होणार आहे. वास्तविक रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आलिकडे झालेल्या टी20 विश्वचषकानंतर टी20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतली. परंतु जसप्रित बुमराहने सांगितले की तो देशासाठी या फाॅरमॅटमध्ये खेळणार आहे.
श्रीलंका दाैऱ्यासाठी संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सुत्राने दिलेल्या महितीनुसार, या दाैऱ्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते आणि येणाऱ्या पुढील क्रिकेट सामन्यासाठी तयार होऊ शकतात. तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रित बुमराह यांना विश्रंती देण्यात आले असून ते सप्टेंबरमध्ये बांग्लादेश विरुद्धच्या होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात शामील होतील.
टीम इंडियाचे ऑगस्ट माहिन्यापासून वेळापत्रक व्यस्त असणार आहे. बांग्लादेश नंतर भारतीय संघ 16 ऑक्टोंबर पासून 5 नोव्हेंबर पर्यंत न्यूझीलंड संघाचे पाहुणचार करेल. ज्यामध्ये संघ 3 कसोटी सामान्याची मालिका खेळणार आहे. यानंतर 8 पासून 15 नोव्हेंबर दरम्यान 4 टी20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होईल. यानंतर 22 नोव्हेंबर पासून ऑस्ट्रेलियामध्ये 5 सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघाला पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफीही डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार तयारी करावी लागणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
विराट कोहलीच्या रेस्टॉरंटवर पोलिसांची कारवाई, रात्री 1.30 वाजेपर्यंत सुरू होता धुमाकूळ
विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत लंडनमध्ये कीर्तनाला पोहचला? व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणून घ्या
डेव्हिड वॉर्नरला निवृत्ती मागे घ्यायची आहे? सूचक इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल