क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी! ३३२ सामने पाहिलेला दिग्गज काळाच्या पडद्याआड

क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी! ३३२ सामने पाहिलेला दिग्गज काळाच्या पडद्याआड

मंगळवार, दिनांक ९ ऑगस्ट रोजी क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी पुढे येत आहे. क्रिकेटविश्वातील दिग्गज पंचांपैकी एक असलेले दक्षिण आफ्रिकी पंच रूडी कर्स्टन (Rudi Koertzen) यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ते ७३ वर्षांचे होते. दक्षिण आफ्रिकेतील रिव्हर्सडेल येथे मंगळवारी सकाळी त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात त्यांच्यासह आणखी ३ जण ठार झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील एका स्थानिक वृत्तपत्राच्या अहवालात त्यांच्या मृत्यूबद्दल सांगितले गेले आहे. 

माध्यमांतील वृत्तांनुसार, रुडी कर्स्टन गोल्फ खेळण्यासाठी गेले होते. गोल्फ खेळून झाल्यानंतर केपटाऊनमधील नेल्डन मंडेला बे स्थित आपल्या घरी परतत असताना रिव्हर्सडेल येथे त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यांची कार दुसऱ्या वाहनाला जोराने धडकली, ज्यामध्ये रुडी यांच्यासह तिघांचे प्राण गेले.

रुडी हे क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्टित पंचांपैकी एक होते. त्यांनी एकूण ३३२ आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदानी पंचाची भूमिका निभावली होती. यामध्ये १०८ कसोटी, २०९ वनडे आणि १४ टी२० सामन्यांचा समावेश आहे. ते बरीच वर्षे आयसीसीच्या एलिट पॅनेलचाही भाग होते. त्यांनी ९ डिसेंबर १९९२ साली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यातून पंच म्हणून पदार्पण केले होते. कसोटी क्रिकेटमध्येही त्यांनी पहिल्यांदा भारताविरुद्धच पंचगिरी केली होती. पंच म्हणून तब्बल १८ वर्षांची कारकिर्द राहिली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘रवी शास्त्रींच्या आहेत खूप मोठ्या ओळखी!’, नवीन इंस्टा पोस्ट होतीये व्हायरल

पुनित बालन गृप प्रस्तुत ४९वी राज्यस्तरिय वरिष्ठ गट ज्यूदो स्पर्धा नाशिकमध्ये

एशिया कपमध्ये टीम इंडियासाठी पाकिस्तान नाही तर ‘हा’ संघ ठरतोयं डेंजर

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.