• About Us
मंगळवार, मे 30, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

आशिया चषक: १९ वर्षांखालील भारतीय संघाची विजयी सलामी; हरनूर सिंग-यश धूलच्या कामगिरीच्या जोरावर यूएई पराभव

आशिया चषक: १९ वर्षांखालील भारतीय संघाची विजयी सलामी; हरनूर सिंग-यश धूलच्या कामगिरीच्या जोरावर यूएई पराभव

Omkar Janjire by Omkar Janjire
डिसेंबर 24, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Harnoor-Singh

Photo Courtesy: Twitter/@BCCI


सध्या १९ वर्षाखालील आशिया चषक (under 19 asia cup 2021)  खेळला जात आहे. आशिया चषक खेळण्यासाठी भारताचा १९ वर्षाखालील संघ (under 19 Indian team) यूएई दौऱ्यावर आहे आणि या स्पर्धेची सुरुवात संघाने विजयासह केली आहे. गुरुवारी (२३ डिसेंबर) भारतीय संघाने त्यांच्या आशिया चषकातील अभियानाची सुरुवात केली. पहिल्या सामन्यात भारतासमोर यूएई संघाचे आव्हान होते. या सामन्यात भारतीय संघाने १५४ धावांनी मोठा विजय मिळवला.

यूएई संघाने सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ विकेट्सच्या नुकसानावर २८२ धावा केल्या आणि यूएईला विजयासाठी २८३ धावांचे लक्ष दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना यूएई संघ स्वस्तात गुंडाळला गेला आणि परिणामी भारताने सामन्यात विजय मिळवला. यूएई संघ ३४.३ षटकात आणि १२८ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने आशिया चषकातील त्यांचा पहिला विजय सहजासहजी मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर फलंदाज हरनूर सिंगने १३० चेंडूत सर्वाधिक १२० धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्याने केलेल्या या शतकी खेळीत तब्बल ११ चौकारांचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त भारतीय संघाचा कर्णधार यश धूल (Yash Dhull) यानेही ६८ चेंडूत चार चौकारांच्या मदतीने ६३ धावांचे महत्वाचे योगदान दिले.

अधिक वाचा – “गांगुलीला कर्णधारपदावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही”, दिग्गज भारतीय क्रिकेटर कडाडला

तसेच सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या राजवर्धन हंगर्गेकरने २३ चेडूंचा सामना केला आणि यामध्ये सहा चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४८ धावांची धुवाधार खेळी केली. भारतीय संघातील दोन फलंदाज धावबाद झाले, तर यूएईच्या आलीशान शराफूने २ आणि अयान खानने १ विकेट घेतली.

व्हिडिओ पाहा – युवी अन् भज्जीमुळं भर टीम मीटिंगमध्येच रडला दादा

यूएईच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्यांच्या संघाने या सामन्यात तब्बल नऊ खेळाडूंना गोलंदाजीची संधी दिली, पण तरही भारतीय संघाने ५० षटके खेळून काढली आणि अपेक्षित धावसंख्याही बनवली. फलंदाजीत यूएईचा संघ ३४.३ षटकात १२८ करून सर्वबाद झाला. भारतासाठी गोलंदाजीमध्ये हंगर्गेकरने ३ विकेट्स घेतल्या, तर गर्व सांगवान, विकी ओसवाल आणि कौशल तांबले यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स मिळवल्या. आता स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानशी २५ डिसेंबर रोजी भिडणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

विजय हजारे ट्रॉफी: ‘या’ चार संघांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, पाहा वेळापत्रक

प्रो कबड्डी २०२१: दबंग दिल्लीचा पुणेरी पलटनला पराभवाचा धक्का, नवीन कुमार ठरला विजयाचा नायक


Previous Post

काय सांगता! ४१ वर्षीय गोलंदाजाच्या नावावर २०२१ वर्षात सर्वाधिक टी२० मेडन ओव्हरचा विक्रम, पाहा यादीतील टॉप ३ खेळाडू

Next Post

रवींद्र जडेजावरही चढला ‘पुष्पा’ चित्रपटाचा फिव्हर; शेअर केलेल्या व्हिडिओवर अल्लू अर्जुनची खास कमेंट

Next Post
Ravindra-Jadeja

रवींद्र जडेजावरही चढला 'पुष्पा' चित्रपटाचा फिव्हर; शेअर केलेल्या व्हिडिओवर अल्लू अर्जुनची खास कमेंट

टाॅप बातम्या

  • नवा हंगाम नवा विजेता! IPL 2023ला मिळाला ‘Purple Cap’ विनर, टॉप 5 खेळाडूंमध्ये गुजरातचे 3 धुरंधर
  • अनुभवावर नव्या दमाची प्रतिभा भारी! शुबमनने पटकावली IPL 2023ची ऑरेंज कॅप; यादीत CSKचा एकच धुरंधर
  • ब्रेकिंग! CSK ने पाचव्यांदा जिंकली IPL ची ट्राॅफी, थरारक फायनलमध्ये गुजरातचा निसटता पराभव
  • सुदैवाने पावसानंतरही फायनल मॅच खेळली जाणार, सीएसकेला विजयासाठी ‘इतक्या’ धावांचे आव्हान
  • IPL प्ले-ऑफ्सचा राजा गुजरात टायटन्स! फायनलमध्ये चेन्नईला चोपत नावावर केला खास विक्रम
  • आयपीएल फायनलमध्ये सर्वात महागात पडलेले ‘हे’ गोलंदाज, तुषार देशपांडे यादीत नव्याने सामील
  • IPL ब्रेकिंग! अहमदाबादेत पुन्हा धो-धो, अंतिम सामना थांबवला, पाऊस न थांबल्यास काय होणार?
  • फायनलमध्ये साईने दिले ‘सुदर्शन’! चेन्नईची गोलंदाजी फोडत ठोकल्या वादळी 96 धावा
  • डब्ल्यूटीसी फायनलआधी ऑस्ट्रेलियासाठी गुड-न्यूज, वेगवान गोलंदाजाचे संघात पुनरागमन
  • ‘अरे तू कॅच नाही, IPL ट्रॉफी ड्रॉप केली’, गिलचा झेल सोडल्यानंतर चाहर जोरदार ट्रोल
  • ‘शोमॅन’ गिलने केले ऋतुच्या विक्रमावर ‘राज’! 16 वर्षांच्या आयपीएल इतिहासात ठरला नंबर वन
  • वय झालं तरी चित्त्याची चपळाई कमी होत नसते! गिलला यष्टीचित करणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव, बघा तो Video
  • हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित
  • जेव्हाही IPL इतिहासाची पाने पाहिली जातील, तेव्हा ‘या’ विक्रमात धोनीच दिसेल ‘टॉपर’, पाहा रेकॉर्ड
  • फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा
  • IPL Final 2023 : पहिला निकाल धोनीच्या बाजूने, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
  • विराटबाबत बोलताना इरफानचा गंभीरवर निशाणा, अष्टपैलूचे वक्तव्य बनले चर्चेचा विषय
  • भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूसाठी पुढील 6 ते 8 महिने खूपच महत्त्वाचे, दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
  • ‘पाय पकडू नको भावा…’, IPL संपल्यानंतर अलीगडला पोहोचताच रिंकूने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, Video
  • WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In