प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात पाचवा सामना गुरुवारी (२३ डिसेंबर) दबंग दिल्ली केसी विरुद्ध पुणेरी पलटन संघात पार पडला. बंगळुरूच्या शेराटन ग्रँड, व्हाईटफिल्ड येथे झालेल्या या सामन्यात दबंग दिल्लीने पुण्याच्या संघाला पराभवाचा धक्का दिला. दबंग दिल्लीने पुणेरी पलटनला ४१-३० गुणांच्या फरकाने पराभूत केले.
दबंग दिल्लीच्या विजयाचा नायक ठरला तो युवा रेडर नवीन कुमार. त्याने या सामन्यात खेळताना सलग २२ वे सुपर टेन पूर्ण केला. त्याने या सामन्यात एकूण १६ गुण मिळवले.
या सामन्यात मध्यंतरापर्यंत दबंग दिल्लीने २२-१५ अशा गुणांनी आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्यांनी पुढे कायम राखत विजय मिळवला.
Dabang-giri ke baad ki Da-first jeet 💪😍@DabangDelhiKC start their #SuperhitPanga with a commanding win over @PuneriPaltan! 💥#DELvPUN #vivoProKabaddi pic.twitter.com/kfQdgjTEzl
— ProKabaddi (@ProKabaddi) December 23, 2021
गुरुवारी चौथा सामना गुजरात जायंट्स आणि जयपूर पिंक पँथर्स संघात पार पडला होता. हा सामना गुजरात जायंट्सने ३४-२७ अशा गुणांच्या फरकाने जिंकला. कोरोनामुळे गेल्या दिड वर्षात कबड्डीविश्व शांत होते. मात्र, आता प्रो कबड्डी लीगच्या २०२१-२२ हंगाम सुरु झाल्याने कबड्डी विश्वात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.
अधिक वाचा – क्लब कबड्डी ते प्रो कबड्डीपर्यंतचा प्रवास करणारा कल्याणचा ‘पोस्टर बॉय’ श्रीकांत जाधव
आठव्या प्रो कबड्डी लीग हंगामातील पहिल्या दिवशी ‘यू मुंबा’ संघाने प्रतिस्पर्धी ‘बंगळुरु बुल्स’ संघाचा ४६-३० च्या फरकाने फडशा पाडत हंगामातील पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली होती. तसेच तेलगू टायटन्स आणि तमिळ थलायवाज यांच्यात ४०-४० अशी बरोबरी झाली. तिसरा सामना बंगाल वॉरियल्सने युपी योद्धाला ३८-३३ च्या फरकाने पराभूत करत जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी २०२१: गुजरात जायंट्सची विजयाने सुरुवात; जयपूर पिंक पँथर्सला पाजले पराभवाचे पाणी