बुधवार (२२ डिसेंबर) पासून भारतात कबड्डीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठी स्पर्धा ‘प्रो कबड्डी लीग’ स्पर्धेला सुरुवात झाली. गेल्या वर्षी कोरोना महामारीअसल्यामुळे ही स्पर्धा खेळवली गेली नव्हती. परंतु यंदा पुन्हा एकदा ही स्पर्धा त्याच जल्लोषाने सुरू झाली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मातीतील २३ खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यापैकीच एक म्हणजे कल्याणच्या कोळसेवाडी विभागातील स्थानिक कबड्डी क्लब ‘शिव शंकर क्रीडा मंडळा’चा खेळाडू श्रीकांत जाधव.(shrikant jadhav)
श्रीकांत जाधव प्रो कबड्डी लीग (pro kabaddi league) स्पर्धेत युपी योद्धा संघाचे प्रतिनिधित्व करतोय. चपळ चढाईपटू, ‘टो टच’चा बादशहा म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या श्रीकांत जाधवने २०१६ मध्ये आपल्या प्रो कबड्डी कारकिर्दीला सुरुवात केली होती. तर या स्पर्धेतील पहिला सामना त्याने बंगाल वॉरियर्स संघासाठी खेळला होता.
स्पर्धेतील तिसऱ्या आणि चौथ्या हंगामात त्याने बंगाल वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तर पुढील हंगामात त्याची यु मुंबा (u mumba) संघात निवड झाली होती. गेल्या २ हंगामापासून तो युपी योद्धा संघासाठी खेळतोय. यावेळी देखील युपी योद्धा संघाने त्याच्यावरील विश्वास कायम ठेवला आणि त्याला ७२ लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. तो राष्ट्रीय स्पर्धेत रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करतो.
मूळचा अहमदनगर येथील असणारा श्रीकांत कल्याणमध्ये स्थानिक कबड्डी क्लब ‘शिव शंकर क्रीडा मंडळा’चे प्रतिनिधित्व करतो. याच संघाने त्याला वेगळी ओळख निर्माण करून दिली. यश मिळवायचं म्हटलं की, मेहनत करावीच लागते. आज श्रीकांतने जे काही मिळवलं आहे ते स्वतःच्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर मिळवले आहे. सुरुवातीच्या काळात कुटुंबीयांचा विरोध, बेताची परिस्थिती, टोमणे या सर्व समस्या होत्याच. परंतु या समस्यांवर मात करत त्याने यशाचे शिखर गाठले आहे. त्याच्या कुटुंबीयांना देखील वाटायचे की, त्याने शिक्षण घ्यावं आणि चांगली नोकरी करावी. परंतु आता कबड्डीच्या बळावर तो रेल्वे संघाकडून खेळतोय आणि रेल्वेमध्ये नोकरी देखील करतोय.(journey of shrikant jadhav)
प्रो कबड्डीच्या सुरुवातीच्या हंगामात त्याची जयपूर पिंक पँथर्स संघात निवड करण्यात आली होती. परंतु त्यावेळी त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्यावेळी शस्त्रक्रिया करण्यासाठी देखील पैसे नव्हते. अशा परिस्थितीत मित्रांनी पुढाकार घेत कर्ज काढले आणि त्याची शस्त्रक्रिया केली. “आज श्रीकांत जाधव जे काही आहे ते मित्रांमुळेच आहे”, हे श्रीकांत जाधव अभिमानाने सांगतो.
महत्वाच्या बातम्या :
प्रो कबड्डी २०२१ : ‘बंगाल वाॅरियर्स’चा ‘युपी योद्धा’ संघाला दणका, ३८-३३च्या फरकाने सामना घातला खिशात
हे नक्की पाहा :