प्रो कबड्डी लीग २०२१ला बुधवार (२२ डिसेंबर) रोजी धमाक्यात सुरुवात झाली. यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या पहिल्याच दिवशी तिसरा सामना हा बंगाल वॉरियर्स आणि यूपी योद्धा संघात झाला. बंगाल वॉरियर्सने ३८-३३ च्या फरकाने या सामन्यात बाजी मारली आहे.
Must say, tenu yeh suit kaafi suit karda 🔥#SuperhitPanga #BENvUP #vivoProKabaddi pic.twitter.com/gDxhSMnK2l
— ProKabaddi (@ProKabaddi) December 22, 2021
प्रो कबड्डी हंगामाच्या पहिल्याच सामन्यात यु मंबा संघाची विजयी सलामी :
दरम्यान, बंगाल वॉरियर्स आणि यूपी योद्धा यांच्यापूर्वी आठव्या हंगामातील दुसरा सामना तमिळ थलाईवाज आणि तेलगू टायटन्स यांच्यात झाला. शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेला हा सामना ४०-४० अशा बरोबरीत सुटला.
हेही वाचा- प्रो कबड्डी २०२१ : ‘यू मुंबा’कडून ‘बंगळुरु बुल्स’चा ४६-३० च्या फरकाने फडशा, हंगामात विजयी सलामी
तत्पूर्वी पहिला सामना ‘यू मुंबा’ आणि ‘बंगळुरु बुल्स’ संघात झाला. या सामन्यात बंगळुरुला धोबीपछाड देत मुंबईने पहिला विजय नोंदवला. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये ‘यू मुंबा’ने २४-१७ अशी आघाडी घेत बंगळुरु बुल्स संघाचे मनोबल खच्ची केले होते. तसेच, दुसऱ्या हाफमध्येही ९ पॉइंट्सची भर घालून यू मुंबाने सामना ४६-३० च्या फरकाने जिंकला.
महत्वाच्या बातम्या :
ऋतुराज ते अय्यर, आयपीएलपासून ते टी२० विश्वचषक; ‘या’ १० युवा खेळाडूंचा राहिला बोलबाला
Video: तब्बल २४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत सचिन एकदाच झाला यष्टीचीत, जाणून घ्या कोण होता तो गोलंदाज
हेही पाहा-
ते परत आलेत! भारतीय क्रिकेटचे शिवधनुष्य पेलतेय ‘बॅच ऑफ १९९६’ | Indian Cricket Batch of 1996