---Advertisement---

लहान मुलांचे अश्लील फोटो स्वतःजवळ ठेवायचा ‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, आता झालाय ४ वर्षांचा तुरुंगवास

On: बुधवार, डिसेंबर 22, 2021 10:14 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियातील माजी क्रिकेटपटू एरॉन समर्स (aaron summers) याला न्यायालयाने चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. एरॉन समर्सकडे लहान मुलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळले असल्यामुळे त्याला ही शिक्षा करण्यात आली आहे. माहितीनुसार समर्सचा मागच्या अनेक महिन्यांपासून या गोष्टींशी संबंध होता. आता त्याला कमीत कमी पुढच्या दोन वर्षांपर्यंत जामीन मिळणार नाही. तो यापूर्वी २०१७-१८ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेंससाठी खेळला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, समर्स इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट यासारख्या सोशल मीडिया माध्यमांच्या मदतीने साधारणतः १६ वर्षाच्या मुलांसोबत संपर्क साधत असायचा. त्याच्याकडे लहान मुलांचे जवळपास ८० अश्लील फोटो होते. न्यायाधीश जॉन बर्न्सने सांगितले की, समर्सने हे फोटो या मुलांना ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने ठेवले होते. तसेच त्यांनी असेही सांगितले की, समर्सने केलेल्या या कृत्याला शिकार झालेली ही मुले पुढे गुन्हेगार बनू शकतात.

माध्यमांशी बोलताना न्यायाधीश  जॉन बन्स म्हणाले की, “त्या मुलांनी समर्सला हे अश्लील फोटो पाठवले होते. या गोष्टीचा खुलासा त्यांनी कधीच करू नये, यासाठी त्याने हे फोटो स्वतःजवळ ठेवले होते.” समर्सच्या वकिलांनी त्याची शिक्षा कमी होण्यासाठी अपील केली होती आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये राहण्याची मागणीही केली होती. पण त्यांची ही मागणी न्यायालयाने मान्य केली नाही. परिणामी समर्सला तुरुंगात जावे लागले.

दरम्यान, मे महिन्यात देखील समर्स एकदा तुरुंगात जाऊन आला आहे आणि आता पुन्हा किमान दोन वर्षांसाठी त्याला तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. तत्पूर्वी त्याने २०१७-१८ मध्ये त्याने बिग बॅश लीगच्या होबार्ट हरिकेंस संघाकडून त्यांचे टी-२० पदार्पण केले होते. तर तस्मानिया संघाकडून जेएलटी एकदिवसीय चषक खेळताना १९ सप्टेंबर २०१८ मध्ये त्याने लिस्ट ए पदार्पण केले होते. त्याव्यतिरिक्त २०२०-२१ मध्ये तो पाकिस्तान चषकात पंजाब संघात भाग होता. यावेळी तो पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणारा पहिला विदेशी खेळाडू ठरला होता.

महत्वाच्या बातम्या –

रुग्णालयात बेडची सुविधा, स्वदेशी परतण्याची मुभा… द. आफ्रिकेत ओमीक्रॉन वाढल्यास कशी असेल पुढची प्लॅनिंग?

पार्टी टाईम! प्रशिक्षक द्रविडसंगे भारतीय खेळाडूंनी घेतला ‘बीबीक्यू नाईट’चा आनंद, पाहून तोंडाला सुटेल पाणी

जशी आहेस, तशीच राहा..! बड्डेदिनी रोहित शर्माच्या पत्नी रितिकाला प्रेमळ शुभेच्छा

व्हिडिओ पाहा –

युवी अन् भज्जीमुळं भर टीम मीटिंगमध्येच रडला दादा |When Yuvraj’s Prank Made Ganguly Cry

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---