भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार आणि दिग्गज सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या दुखापतीमुळे विश्रांतीवर आहे. रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) यांची जोडी अनेकदा चर्चेचा विषय ठरत असते. चाहत्यांना नेहमीच या दोघांविषयी उत्सुकता असते. २१ डिसेंबर रोजी रोहितची पत्नी (Rohit Sharma’s Wife) रितिकाचा वाढदिवस (Ritika Sajdeh’s Birthday) होता. यानिमित्ताने रोहितने इंस्टाग्राम खात्यावरून एक खास पोस्ट करून त्याच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रोहितने त्याच्या स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून रितिकाचा एक खास फोटो शेअर केला आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टमध्ये रोहितने रितिकाची स्तुती केली आहे आणि ती जशी आहे तशीच राहावी, असे असे म्हटले आहे. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू जशी आहेस, तशीच राहा, हीच गोष्ट तुला खूप आकर्षक बनवते.”
दरम्यान, भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. परंतु रोहित शर्माला या मालिकेपूर्वी सराव करताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आणि त्या संपूर्ण कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली.
कसोटी मालिकेपूर्वी जेव्हा भारतीय संघाची घोषणा केली गेली होती, तेव्हा रोहितला कसोटी संघाचा उपकर्णधार घोषित केले गेले होते. तसेच यावेळी एकदिवसीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडून काढून रोहित शर्माला देण्यात आले होते. आता रोहितच्या गैरहजेरीत प्रियांक पांचालला कसोटी संघात सामील केले गेले आहे. एकदिवसीय मालिकेसाठी रोहित उपस्थित राहील, अशी शक्यता आहे.
हिटमॅनचा ‘हिट’ कारनामा! ५ वर्षांपूर्वी रोहितने केवळ ३५ चेंडूत केली होती शतकी खेळी
रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत ४३ कसोटी, २२७ एकदिवसीय आणि ११९ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ३०४७ धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय मध्ये ९२०५ आणि टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ३१९७ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘हे’ आहेत वर्ष २०२१ चे टॉप-१० टी२० फलंदाज, यादीत पाकिस्तानींचा बोलबाला; तर एकही नाही भारतीय
आयएसएल: एटीके मोहन बागानचा नॉर्थ ईस्ट युनायटेडवर निसटता विजय; ह्युगो बॉमॉस ठरला मॅचविनर
रूटच्या डोक्यावरून सरकला नंबर १ चा ताज, कोहलीचेही नुकसान; ‘हा’ खेळाडू अव्वल स्थानी
व्हिडिओ पाहा –