२०२१ च्या संपूर्ण वर्षात क्रिकेटविश्वात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. यावर्षी टी-२० विश्वचषक देखील खेळला गेला. टी-२० विश्वचषकात आणि एकंदरीत या संपूर्ण वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी अप्रतिम प्रदर्शन केले. पाकिस्तान संघाचे यावर्षी टी-२० विश्वचषकातील प्रदर्शन वाखाणण्याजोगे होते. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आजम (Babar Azam) आणि मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) यांनी संपूर्ण वर्षात उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांचे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रदर्शन पाहिले तर, ते सर्वोत्तम होते. तर दुसरीकडे भारतीय संघातील फलंदाजांनी मात्र या संपूर्ण वर्षात चाहत्यांची निराशा केली.
यावर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या १० खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने यावर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने खेळलेल्या ११ टी-२० सामन्यांमध्ये ४२४ धावा केल्या आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये (t20i cricket) यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो १९ व्या स्थानवर आहे. आपण या लेखात यावर्षी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या १० खेळाडूंची माहिती घेणार आहोत.
१०. इविन लेविस (evin lewis), वेस्ट इंडीज –
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्यांचा विचार केला, तर वेस्ट इंडीज संघाचा डावखुरा सलामीवीर इविन लेविस या यादीत १० व्या क्रमांकावर आहे. लेविसने यावर्षी वेस्ट इंडीजसाठी १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि यामध्ये ४८९ धावा केल्या. या धावा त्याने २८.८७ ची सरासरी आणि १५५.७३ च्या स्ट्राइक रेटने केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७९ धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे. तसेच त्याच्या ४ अर्धशतकांचा देखील यामध्ये समावेश आहे.
९. मोहमदुल्लाह (mohammad mahmudullah), बांगलादेश –
मोहम्मद मोहमदुल्लाह सध्या बांगलादेश टी-२० संघाचा कर्णधार आहे. तो बांगलादेश संघाचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि यावर्षीचे त्याचे टी-२० आंतरराष्ट्रीयमधील प्रदर्शन देखील उत्कृष्ट राहिले आहे. यावर्षी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये मोहम्मदुल्लाह ९ व्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी खेळलेल्या २६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४९६ धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी २३.६१ आणि स्ट्रइक रेट १०५.३० होता. यावर्षीच्या त्याच्या सर्वोत्तम धावसंख्येचा विचार केला तर ती ५२ आहे. तसेच त्याच्या दोन अर्धशतकांचा देखील यामध्ये समावेश आहे.
८. क्विंटन डी कॉक (Quinton de Kock), दक्षिण अफ्रिका –
दक्षिण अफ्रिका संघाचा यष्टीरक्षक फलंदाज या यादीत ८ व्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि यामध्ये ४३.६६ ची सरासरी आणि १३१.३२ च्या स्ट्राइक रेटने ५२४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या ७२ होती, तर पाच अर्धशतकांचा देखील समावेश आहे.
७. एडम मार्करम (Aiden Markram), दक्षिण अफ्रिका –
दक्षिण अफ्रिकेचा उत्कृष्ट फलंदाज एडम मार्करम या यादीत ७ व्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी दक्षिण अफ्रिकेसाठी एकूण १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि यामध्ये ४३.८४ ची सरासरी आणि १४८.८२ च्या स्ट्राइक रेटने ५७० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली, तर ६ वेळा अर्धशतकी खेळी साकारली.
६. मोहम्मद नईम (Mohammad Naim), बांगलादेश –
बांगलादेश संघाचा युवा फलंदाज मोहम्मद नईम या यादीत ६ व्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी २६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बांगलादेश संघाचे प्रतिनिधित्व केले आणि यामध्ये २३ ची सरासरी आणि १००.३४ च्या स्ट्राइक रेटने ५७५ धावा फटकावल्या. त्याच्या प्रदर्शनात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान त्याने ६४ धावांची सर्वोत्तम खेळी केली.
५. जोस बोटलर (Jos Buttler), इंग्लंड –
इंग्लंड संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज जोस बोटलर या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. त्याने यावर्षी १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आणि ५८९ धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी ६५.४४ होती, तर स्ट्राइक रेट १४३.३० होता. या धावा त्याच्या ५ अर्धशतकांचा आणि एका शतकाचा समावेश आहे. यादरम्यान त्याने १०१ धावांची सर्वोत्तम खेळी केली.
४. मिचेल मार्श (Mitchell Marsh), ऑस्ट्रेलिया –
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी ऑस्ट्रेलिया संघासाठी २१ टी-२० सामने खेळले आणि यामध्ये ६२७ धावा केल्या. या धावा त्याने ६ अर्धशतकांच्या मदतीने केल्या, तर ७७ धावांची सर्वोत्तम खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १२९.८१ धावांचा होता आणि ३६.८८ ची सरासरी होती.
३. मार्टिन मप्टिल (Martin Guptill), न्यूझीलंड –
न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल या यादीत तिसऱ्या स्ठानावर आहे. यावर्षी त्याने १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि ६७८ धावा केल्या. त्याने या धावा ५ अर्धशतकांच्या मदतीने केल्या आणि यामध्ये ९७ धावांच्या सर्वोत्तम खेळीचाही समावेश आहे. यादरम्यान त्याची सरासरी ३७.६६ होती, तर स्ट्राइक रेट १४५.४९ होता.
२. बाबर आजम (Babar Azam), पाकिस्तान –
पाकिस्तान संघाचा उत्कृष्ट फलंदाज आणि कर्णधार बाबर आजम यावर्षी टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने यावर्षी २९ टी-२० आंतरराष्ट्रीट सामने खेळले आणि ९३९ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ९ अर्धशतक आणि १ शतकाचा समावेश आहे. यादरम्यान त्याने १२२ धावांची सर्वोत्तम खेळी देखील केली. यावर्षी टी-२० मध्ये केलेल्या या धावा त्याने ३७.५६ च्या सरासरीने आणि १२७.५७ च्या स्ट्राइक रेटने केल्या आहेत.
१. मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan), पाकिस्तान –
पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवानने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये यावर्षी सर्वाधिक धावा केल्या. त्याने यावर्षी २९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. या सामन्यांमध्ये त्याने ७३.६६ ची सरासरी आणि १३४.८९ चा स्ट्राइक रेट राखून १३२६ धावा केल्या. यामध्ये त्याच्या १०४ धावांच्या सर्वोत्तम खेळीचा समावेश आहे. तसेच १२ अर्धशतक आणि १ शतक देखील केले.
महत्वाच्या बातम्या –
कडक ना भावा!! ‘या’ २३ वर्षीय फलंदाजाने सलग ५ षटकार मारल्यानंतर आता झळकावले तुफानी शतक
Video: तब्बल २४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत सचिन एकदाच झाला यष्टीचीत, जाणून घ्या कोण होता तो गोलंदाज
विश्वविजेत्या खेळाडूंचा देशी अंदाज! ‘८३’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी १९८३ बॅचची हजेरी, फोटो व्हायरल
व्हिडिओ पाहा –