---Advertisement---

कडक ना भावा!! ‘या’ २३ वर्षीय फलंदाजाने सलग ५ षटकार मारल्यानंतर आता झळकावले तुफानी शतक

On: बुधवार, डिसेंबर 22, 2021 4:15 PM
Avishka Fernando
---Advertisement---

सध्या श्रीलंकेतील सर्वात मोठी टी२० लीग स्पर्धा ‘लंका प्रीमियर लीग २०२१’ (Lanka premier league) स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात असा काही ना काही प्रकार घडत आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. मंगळवारी (२१ डिसेंबर) या स्पर्धेतील क्वालिफायरचा दुसरा सामना पार पडला. या सामन्यात दांबुला जायंट्स आणि जाफना किंग्ज (Dambulla giants vs Jaffna kings) हे दोन्ही संघ आमने सामने होते. दरम्यान या सामन्यात २३ वर्षीय फलंदाज अविष्का फर्नांडोने तुफानी खेळी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

अविष्का फर्नांडो याने (Avishka Fernando) काही दिवसांपूर्वी ५ चेंडूंमध्ये सलग ५ षटकार मारले होते. आता मंगळवारी (२१ डिसेंबर) झालेल्या सामन्यात त्याने तुफानी शतक झळकावले आहे. हे त्याच्या टी२० कारकिर्दीतील पहिलेच शतक आहे. या शतकी खेळीच्या जोरावर त्याने आपल्या संघाला २०० पेक्षा अधिक धावांचा डोंगर उभारून दिला. (Avishka Fernando century in Lanka premier league)

नक्की वाचा : Video: पाच वर्षांपूर्वी कर्णधार रोहित शर्माने आणले होते वादळ! टी२० मध्ये झळकावले होते वेगवान शतक

या सामन्यात अविष्का फर्नांडो सलामी फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने अवघ्या ६३ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. या खेळी दरम्यान १० चौकार आणि ४ षटकार मारले होते. या खेळीसह त्याने अफगानिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाजसोबत १२२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीत रहमानुल्लाह गुरबाजने ४० चेंडूंमध्ये ७० धावांची खेळी केली.

यापूर्वी ९२ धावांची केली होती खेळी
ही खेळी खेळण्यापूर्वी अविष्का फर्नांडोच्या टी२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ७९ सामन्यातील ७६ डावात २४ च्या सरासरीने १७०० धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने १२ अर्धशतक झळकावले होते. तसेच नाबाद ९२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. तसेच टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ३० टी२० सामन्यात ३२५ धावा केल्या आहेत.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, जाफना किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी बाद २१० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दांबुला जायंट्स संघाला ९ बाद १८७ धावा करण्यात यश आले. हा सामना जाफना किंग्ज संघाने २३ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

पुनरागमनाची आस! फॉर्ममध्ये परतण्यासाठी केकेआरचा ‘हा’ शिलेदार मैदानात गाळतोय घाम, व्हिडिओ व्हायरल

दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाजांनी केलेल्या ‘या’ ५ खेळींनी जिंकली सर्वांची मनं

नक्की पाहा : ते परत आलेत! भारतीय क्रिकेटचे शिवधनुष्य पेलतेय ‘बॅच ऑफ १९९६’

ते परत आलेत! भारतीय क्रिकेटचे शिवधनुष्य पेलतेय 'बॅच ऑफ १९९६' | Indian Cricket Batch of 1996

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---