---Advertisement---

ख्रिस गेल किंवा मॅक्सवेल नाही तर या फलंदाजाच्या नावावर सर्वात लांब षटकाराची नोंद

On: शुक्रवार, डिसेंबर 6, 2024 8:48 AM
Melbourne Cricket Ground
---Advertisement---

क्रिकेटमधील सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम ना ख्रिस गेलच्या नावावर आहे ना महेंद्रसिंग धोनी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर. 100 वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम झाला होता. परंतु आजपर्यंत कोणीही या विक्रमाच्या जवळपासही पोहोचू शकलेले नाही.

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लांब षटकार 19व्या शतकात अल्बर्ट ट्रॉटने मारला होता. अल्बर्ट ट्रॉट हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी क्रिकेट खेळला आहे. 19व्या शतकात अल्बर्टने एक षटकार मारला जो लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या पॅव्हेलियनमध्ये गेला. त्याच्या षटकाराची लांबी 164 मीटर होती. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात लांब षटकार होता. इंग्लंडच्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबकडून खेळताना अल्बर्टने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा शॉट मारला होता. हा तोच शॉट होता ज्यात चेंडू सीमापार गेला होता.

अल्बर्ट ट्रॉट हा 19व्या शतकातील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक होता. तो इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी क्रिकेट खेळला आहे. इतिहासातील सर्वात लांब ‘सिक्सर’ अल्बर्टच्या नावावर आहे. त्याने 164 मीटरमध्ये षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. 19व्या शतकात गोलंदाजांना अल्बर्ट ट्रॉटच्या नावाची भीती वाटायची. या खेळाडूने 1910 मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानचा माजी स्फोटक अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक धोकादायक आणि स्फोटक खेळी खेळल्या. शाहिद आफ्रिदीने 2013 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 158 मीटर लांब षटकार मारला होता.

सर्वाधिक लांब षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दोन भारतीयांचाही समावेश आहे. ज्यात युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांचे नावे आहे. युवराज सिंगने 119 मीटरमध्ये षटकार मारला आहे. युवीच्या नावावर टी-20 मध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारण्याच्या विक्रमाचाही समावेश आहे. तर एमएस धोनीने 112 मीटरमध्ये षटकार मारला आहे. 2007 साली टी20 विश्वचषकात भारताच्या युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या 70 धावांच्या खेळीत ब्रेट लीच्या चेंडूवर 119 मीटर लांब षटकार ठोकला होता.

धोनीने 2011-12 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील सामन्यात खूप धावा केल्या होत्या. ज्यातील एका सामन्यत त्याने एक षटकार लाँग ऑफच्या दिशेने मारला, जी त्या स्टेडियमची खूप मोठी सीमा होती. पण धोनीच्या या षटकाराने ती सीमा सहज पार केली आणि 112 मीटर अंतर कापले.

हेही वाचा-

“या गोष्टींकडे फारसे…”, यशस्वी जयस्वालने केलेल्या स्लेजिंग वर मिचेल स्टार्कची प्रतिक्रिया समोर
पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! झिम्बाब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव
4 षटकार अन् 9 चौकार, अजिंक्य रहाणेचं रौद्र रुप पाहून गोलंदाजांना काहीच सुचेना!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---