---Advertisement---

पंड्या बंधूंच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीने विराट झाला भावूक, ट्विट करत व्यक्त केला शोक

On: शनिवार, जानेवारी 16, 2021 5:29 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पंड्या या बंधूंना शनिवारी (16 जानेवारी) पितृशोक झाला. त्यांचे वडील हिमांशू पंड्या यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार  बडोदा संघाचे जैव-सुरक्षित वातावरण सोडून घरी धाव घेतली असल्याचेही समजते आहे.

या दुख:द बातमीवर भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने शोक व्यक्त केला आहे. कोहलीने ट्विट करत या घटनेवर दु:ख व्यक्त केले. तसेच त्याने हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या या दोघांचेही सांत्वन केले.

कोहलीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “कृणाल आणि हार्दिकच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले आहे. यापूर्वी मी एक-दोनदा त्यांना भेटलो होतो. ते अतिशय स्वच्छंदी आणि जीवनाचा पुरेपूर उपभोग घेणारे व्यक्ती होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. कृणाल आणि हार्दिक, तुम्ही या परिस्थतीत खंबीर रहा.”

विराट कोहलीला नुकतीच मुलगी झाल्याने तो पत्नी अनुष्का शर्मासहित मुंबईतच आहे. तर हार्दिक पंड्या भारताच्या कसोटी संघात समाविष्ट नसल्याने बडोद्यातच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेची तयारी करत आहे.

महत्वाच्या बातम्या:

शुबमन गिल बॅटवरचे स्टिकर सिडनीतच विसरला? पाहा नक्की काय आहे प्रकरण 

सोफी डिवायनच्या मारलेला चेंडू लागला चिमुकलीच्या डोक्याला, मग तिने काय केलं ते पाहाच

PAK vs SA : कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा २० जणांचा संघ जाहीर; तब्बल ८ खेळाडूंना डच्चू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---