इंग्लंडमध्ये सध्या टी-२० ब्लास्ट स्पर्धा जोरात सुरू आहे. शनिवारी (२ जुलै) एसेक्स आणि ग्लेमॉर्गन यांच्यात एक रोमांचक सामना पाहिला गेला. एसेक्स संघाने प्रथम फलंदाजी करताना अडीचशे धावांचा टप्पा ओलांडला, प्रत्युत्तरात ग्लेमॉर्गनला मात्र २०० धावाही करता आल्या नाहीत. मुळचा भारतीय असेलेला प्रेम सिसोदियाला या सामन्यातील एका षटकात तब्बल ५ षटकार पडले. सिससोदियाचे हे षटक पाहिल्यानंतर अनेकांना स्टुअर्ट ब्रॉडची आठवण नक्कीच झाली असावी.
प्रेम सिसोदिया (Prem Sisodiya) ग्लेमॉर्गन (Glamorgan) संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात एसेक्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर तब्बल २५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात ग्लेमॉर्गन संघाने मर्यादित २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसनावर १८५ धावा केल्या. अशा प्रकारे एसेक्स (Essex ) संघाने हा सामना ६९ धावांनी जिंकला.
एसेक्सच्या डावातील १६ व्या षटकात सिसोदिया गोलंदाजीसाठी आला होता. स्ट्राईकवर असलेल्या पॉल वॉल्टरने सोसिदियाच्या पहिल्या चार चैडूंवर सलग चार षटकार चोपले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर देखील त्याने षटकार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु फक्त एक धावा घेऊ शकला. शेवटच्या चेंडूवर डॅन लॉरेंस स्ट्राईकवर आला आणि त्याने देखील षटकार मारला. अशा प्रकारे सिसोदियाच्या या षटकातून एसेक्सला एकूण ३१ धावा मिळाल्या. लॉरेसने या सामन्यात ३७ चेंडूत ७१ धावा केल्या, तर वॉल्टरने २३ चेंडूत ५८ धावा केल्या. प्रेम सिसोदियाने टाकेलल्या ४ षटकात ५७ धावा खर्च करून २ विकेट्स घेतल्या.
https://twitter.com/VitalityBlast/status/1543302958879744000?s=20&t=_JwE63hxSPe6V8Tz0B-ImQ
भारतीय संघा सध्या बर्मिंघममध्ये इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना खेळत आहे. टी-२० ब्लास्टमध्ये सिसोदियाची शनिवारी जशी अवस्था झाली, त्याहिपेक्षा जास्त धुलाई स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याची झाली. शनिवारी इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्याचा दुसरा दिवस असून भारताने सामन्यात चांगली पकड बनवली. इंग्लंडचा दिग्गज स्टुअर्ट ब्रॉडने सामन्याच्या पहिल्या डावात टाकलेले ८४ वे षटक कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटकत ठरले.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या पाचव्या कसटी सामन्यात कर्णधाराची भूमिका पार पाडत असून त्याने फलंदाजीतही महत्वाचे योगदान दिले. ब्रॉडने टाकलेल्या ८४ व्या षटकात बुमराह फलंदाजी करत होता आणि त्यावेळी भारताला या षटकातून ३५ धावा मिळाल्या. षटकात पुमराहने ४ चौकार आणि २ षटकार मारले. यादरम्यान ब्रॉडने ५ वाईड आणि एका नो बॉलचा समावेश होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Video: कर्णधारानेच काढला कर्णधाराचा काटा! बुमराहने टिपला स्टोक्सचा नेत्रदीपक झेल
…म्हणून मुंबई इंडियन्स आहे आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ! बुमराह-ब्रॉडच्या ‘त्या’ षटकाशी आहे कनेक्शन