---Advertisement---

“भारतीय खेळाडूंच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन युवा खेळाडू अजूनही प्राथमिक शाळेतच”, माजी दिग्गजाचा घरचा आहेर

On: शनिवार, जानेवारी 23, 2021 9:41 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला. ॲडीलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर सर्व स्तरातून भारतीय संघावर टीका होत होती. मालिकेत भारतीय संघाचे पुनरागमन जवळजवळ अशक्य असल्याचे मानले जात होते. मात्र प्रमुख खेळाडूंना झालेली दुखापत व विराट कोहलीची पालकत्व रजादेखील अजिंक्यसेनेला रोखू शकली नाही व संघाने मालिकेत जबरदस्त पुनरागमन करत 2-1 ने विजय मिळवला आहे.

या ऐतिहासिक विजयाचे नायक ठरले ते भारताचे भारताचे युवा खेळाडू. भारताने या मालिकेत तब्बल पाच खेळाडूंना आपल्या पदार्पणाची संधी दिली व या सर्व खेळाडूंनी संधीचे सोने केले. अशातच ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेट खेळाडू ग्रेग चॅपेल यांनी भारतीय युवा खेळाडूंची स्तुती करत ऑस्ट्रेलियाचे युवा खेळाडू त्यांच्यासमोर हे एखाद्या प्रायमरी स्कूल मधील विद्यार्थ्यांप्रमाणे आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तपत्रात चॅपेल यांनी लिहले, “भारताच्या युवा खेळाडूंसमोर आपले युवा खेळाडू हे कमजोर जाणवत होते. भारताचे युवा खेळाडू १६ वर्षांखालील स्तरापासूनच पासूनच अवघड परिस्थितीत क्रिकेट खेळलेले आहेत. विल पुकोवस्की आणि कॅमरून ग्रीन हे अनुभवाच्या आधारावर अजूनही प्राथमिक शाळेमध्येच आहेत.”

विशेष म्हणजे चॅपेल यांनी मालिका सुरू होण्यापूर्वी कॅमरुन ग्रीनला रिकी पॉंटिंग नंतर सर्वोत्तम युवा फलंदाज मानले होते. मात्र आता मालिकेचा निर्णय वेगळा लागल्यानंतर चॅपल यांनी आपल्या मतात बदल केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

ब्रिस्बेन कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा निर्णय धाडसी होता, पण, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांची प्रतिक्रिया

BAN vs WI : सलग दुसऱ्या विजयासह बांग्लादेशचा मालिकाविजय, वनडे विश्वचषकाच्या सुपरलीग मध्ये या स्थानी घेतली झेप

तो भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा आहे, पुजाराच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---