---Advertisement---

विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत एकाच डावात सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज

On: बुधवार, जून 9, 2021 4:24 PM
---Advertisement---

विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु होण्यासाठी काही दिवसच उरले आहेत. भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला पोहोचला असून त्यांनी सरावाला सुद्धा सुरुवात केली आहे. विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत अनेक विक्रम झाले. काही फलंदाजीने, गोलंदाजीने तर काही उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळाले. दरम्यान, आपण आज चर्चा करणार आहोत त्या फलंदाजांबद्दल, ज्यांनी या स्पर्धेत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारली.

१) डेव्हिड वॉर्नर- गेली दोन वर्ष चालत असलेल्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमधून धावांची बरसात झाली. या स्पर्धेत एकाच डावात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमही त्याच्याच नावे आहे. डेव्हिड  वॉर्नरने २०१९ साली पाकिस्तानविरुद्ध एडिलेड कसोटीत ३३५ धावांची खेळी साकारली होती. विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत उभारल्या गेलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

२)झॅक क्रॉवली- विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येच्या यादीत दुसऱ्या स्थानी इंग्लंडचा खेळाडू झॅक क्रॉवली आहे. त्याने आजवर इंग्लंड संघा साठी १२ कसोटी सामने खेळले आहेत. पाकिस्तानविरुद्ध झॅक क्रॉवलीने २०२० साली खेळलेल्या कसोटीत साउथॅम्प्टन येथे २६७ धावांची खेळी खेळली.

३)विराट कोहली- या यादीत तिसऱ्या स्थानी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीने आजवर ७वेळा २०० धावांचा टप्पा गाठला आहे. कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१९ साली कसोटी सामन्यात नाबाद २५४ धावांची खेळी केली होती. विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत कोहलीची ही सर्वोत्तम खेळी तसेच कोहलीच्या कारकिर्दीतील देखील ही सर्वोत्तम खेळी ठरली. हा सामना पुणे येथे झाला होता आणि हा सामना भारतीय संघाने सहज जिंकला.

४)केन विलियम्सन- या यादीत चौथ्या स्थानी न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन आहे. विलियम्सनने डिसेंबर २०२० मध्ये, वेस्ट इंडीजविरुद्ध हॅमिल्टन येथे २५१ धावांची मोठी खेळी केली. त्या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या सामन्यात खेळपट्टी पूर्णपणे हिरवीगार होती आणि उसळती होती. अशा खेळपट्टीवर त्याने २५१ धावांची जिगरबाज खेळी केली.

५)दिमुथ करुणारत्ने- श्रीलंका संघाचा कसोटी कर्णधार दिमुथ करुणारत्ने या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध २०२० मध्ये पल्लाकेले स्टेडीयममध्ये २४४ धावांची खेळी केली होती. दिमुथ करुणारत्ने हा श्रीलंका संघाकडून विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत २०० धावा करणारा एकमेव फलंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आठवणीतील सामना! जेव्हा विश्वचषकात झिम्बाब्वेने केला होता बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव; वाचा त्या सामन्याबद्दल

‘या’ कारणामुळे न्यूझीलंडविरुद्ध आर अश्विन ठरु शकतो टीम इंडियाचे प्रमुख शस्त्र

भारत-न्यूझीलंड संघातील ‘या’ ५ खेळाडूंमध्ये आहे खास नाते; १३ वर्षांपासून करत आहेत एकमेकांचा पाठलाग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---