टीम इंडियाचा (India Team) माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) याने भविष्यात प्रशिक्षण देण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. युवराजच्या म्हणण्यानुसार त्याला युवा क्रिकेटपटूंसाठी मेंटॉर म्हणून काम करायला आवडेल. तसेचं भविष्यात फुल टाइम प्रशिक्षक म्हणून काम करेल असेही सांगितले. युवराजने हेही सांगितले आहे की, त्याने आईपीएलमध्ये(IPL) प्रशिक्षकासाठी आशिष नेहरा(Ashish Nehra) यांच्याशी संपर्क केला. पण नेहराकडून त्याला काम मिळाले नाही.
युवराज सिंग (Yuvraj Singh) विषयी बोलायचे झाले तर, त्याने भारतासाठी 2007 साली टी20 विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. युवराजने याच टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 6 चेंडूत 6 षटकार मारले होते. हा विक्रम आजही अबाधित आहे. त्यासोबतचं 2011 सालच्या वनडे विश्वचषकातही त्याने मोठे योगदान दिले होते. युवराजला या विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार दिला गेला होता. युवराजने अनेक विक्रम आजही कोणत्याच खेळाडूला मोडता आले नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा अनुभव पाहता युवा खेळाडूंसाठी त्याचे मार्गदर्शन महत्वाचे ठरू शकते.
युवा खेळाडूंसाठी मेंटॉरचे काम करायला आवडेल- युवराज सिंग
नुकताच युवराज माध्यमांशी बोलत असताना त्याला प्रश्न विचारला गेला की, “भविष्यात फुल टाइम प्रशिक्षक म्हणून काम कराल का?” या प्रश्नाचे उत्तर देत त्याने दिले की, “पाहूया सध्यातरी मी याविषयी विचार केला नाही, कारण माझ्या मुलांकडे माझे लक्ष आहे. जेव्हा माझी मुलं शाळेत जायला लागतील तेव्हा मी याबद्दल विचार करेल. युवा खेळाडूंना आणि विशेष म्हणजे माझ्या राज्यातील खेळाडूंसाठी मेंटॉर म्हणून काम करायला मला आवडेल. मला आईपीएलमध्ये कोणत्यातरी एका संघासाठी मेंटॉरचे काम करायचे आहे. याबद्दल मी आशीष नेहरा यांना विचारले होते पण त्यांने नकार कळवला. येणाऱ्या काळात मी नक्कीचं प्रक्षिशक होण्यासाठी प्रयत्न करीन. तर कोणत्या संघाकडून ही संधी मिळते, हे पाहता येईल.”
दरम्यान, युवराजच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने आतापर्यंत 40 कसोटी, 304 वनडे आणि आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात 1900 कसोटी, 8701 वनडे आणि 1177 टी-20 आंतरराष्ट्रीय दावा त्याने केल्या. तसेच गोलंदाजाच्या रुपात त्याला कसोटी क्रिकेटमध्ये 9, वनडे क्रिकेटमध्ये 111 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 विकेट्स मिळाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
NZ vs PAK । कर्णधार विलियम्सनला पुन्हा दुखापत, न्यूझीलंड संघ आणि चाहत्यांच वाढलं टेंशन
आयपीएल सर्वांसाठी खास; यातूनच टी20 विश्वचषक संघ निवडला जाईल, इंदोर टी-20पूर्वी शिवम दुबेचे वक्तव्य