तब्बल 18 महिन्यांच्या दीर्घ काळानंतर अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने भारतीय संघात पुनरागमन केले. पुनरागमन त्याच्यासाठी खास ठरले. लंडनच्या के ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात रहाणेने अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे, या सामन्यात त्याने षटकार खेचत आपले विक्रमी अर्धशतक पूर्ण केले. तो अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय फलंदाज बनला आहे.
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात अर्धशतक करणारा पहिला भारतीय
भारताच्या डावातील 46वे षटक ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) टाकत होता. कमिन्सच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने खणखणीत षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने 92 चेंडूंचा सामना केला. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 6 चौकारांचा पाऊस पाडला. हे रहाणेच्या कसोटी कारकीर्दीतील 26वे अर्धशतक ठरले. एवढेच नाही, तर तो डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडूही बनला.
रहाणेचा विक्रम
पुढे रहाणेने 69 धावांचा टप्पा पार करताच कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावाही पूर्ण केल्या. तो भारताकडून कसोटीत अशी कामगिरी करणारा 13वा भारतीय खेळाडू ठरला. त्याच्यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, दिलीप वेंगसरकर, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद अझरुद्दीन, गुंडप्पा विश्वनाथ आणि कपिल देव यांनी केला होता. या खेळाडूंनी कसोटीत 5 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
रहाणेचा असाही विक्रम
रहाणेने भारताकडून आणखी एक विक्रम केला आहे. रहाणे भारताच्या त्या खास खेळाडूंच्या यादीत सामील झाला, ज्यांनी आयसीसी अंतिम सामन्यात 50हून अधिक धावा केल्या आहेत. गंभीर एकमेव खेळाडू आहे, ज्याने 2 वेळा आयसीसी अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. (cricketer ajinkya rahane becomes 1st ever indian to score half century in wtc final)
आयसीसी अंतिम सामन्यात भारतासाठी सर्वाधिक वेळा 50हून अधिक धावा करणारे खेळाडू
2 – गौतम गंभीर
1 – अजिंक्य रहाणे
1- एमएस धोनी
1 – सौरव गांगुली
1 – विराट कोहली
1 – हार्दिक पंड्या
1 – वीरेंद्र सहवाग
1- सचिन तेंडुलकर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लायन सर्वकालीन महान फिरकीपटू”, भारताच्या माजी कर्णधाराने केली स्तुती
WTC Final: नेमकं घडलं तरी काय! भज्जी बसला गुडघ्यावर अन् चाहत्यांनी केली वाह वाह, पहा व्हिडीओ





