इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 24वा सामना सोमवारी (दि. 17 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात रंगला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाच्या एका फलंदाजाने वादळी फलंदाजी केली. तो खेळाडू इतर कुणी नसून अजिंक्य रहाणे आहे. चेन्नईला दमदार सुरुवात करून देण्यात रहाणेने मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे, त्याने खेळलेल्या तीनच सामन्यात कौतुकास्पद धावसंख्या उभारली.
झाले असे की, बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडून ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी सामन्याच्या तिसऱ्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सीएसकेला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा वैयक्तिक 3 धावांवर बाद झाला. यावेळी संघाची धावसंख्या 16 इतकी होती. त्यानंतर तिसऱ्या स्थानी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) फलंदाजीला उतरला. रहाणेने येताक्षणीच फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. रहाणे आणि कॉनवे यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी झाली.
5⃣0⃣-run partnership & going strong! 💪
Devon Conway & @ajinkyarahane88 are on the move as @ChennaiIPL move to 69/1 after 8 overs. 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/QZwZlNk1Tt#TATAIPL | #RCBvCSK pic.twitter.com/5ffqpMUhfM
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
आयपीएल 2023 मिनी लिलावात सीएसकेने रहाणेला 50 लाख रुपयांत ताफ्यात सामील केले होते. सीएसकेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत त्याने या सामन्यात 20 चेंडूत 37 धावांची खेळी साकारली. या छोटेखानी खेळीत त्याने 2 षटकार आणि 3 चौकारांचा पाऊस पाडला. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 185 इतका होता. विशेष म्हणजे, रहाणेचा हा आयपीएल 2023 स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्ससाठीचा तिसरा सामना होता. यापूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात त्याने 27 चेंडूत 61 धावांची तडाखेबंद खेळी साकारली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध 19 चेंडूत 31 धावांचा पाऊस पाडला होता.
आयपीएल 2023मध्ये अजिंक्य रहाणे
61 धावा (27 चेंडूत), विरुद्ध- मुंबई इंडियन्स
31 धावा (19 चेंडूत), विरुद्ध- राजस्थान रॉयल्स
37 धावा (20 चेंडूत), विरुद्ध- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
विशेष म्हणजे, त्याच्या या हंगामातील एकूण कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 3 सामन्यात फलंदाजी करताना 65 चेंडूत एकूण 129 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची ही कामगिरी कौतुकास्पद आहे.
Rahane – u R amazing!🥰#RCBvCSK #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/RxMSMmvgdA
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 17, 2023
संघाची धावसंख्या
रहाणेनंतर डेवॉन कॉनवे याला शिवम दुबे याची साथ मिळाली. कॉनवे (83) आणि दुबे (40) दोघांच्या खेळीच्या जोरावर सीएसकेने 15व्या षटकात 2 बाद 165 धावांचा डोंगर उभारला. ही खेळी पाहता सीएसके 200 धावांचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. (Ajinkya Rahane has scored 129 runs from just 65 balls so far in IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल निवृत्तीवर धोनीचं स्पष्टीकरण! म्हणाला, ‘मी असं केलं तर…’
अश्विन बाद झाल्यानंतर ढसाढसा रडली त्याची मुलगी, आईने सावरण्याचा प्रयत्नही केला पण…, व्हिडिओ व्हायरल