इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 7 ते 11 जूनदरम्यान पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यालाही स्थान देण्यात आले आहे. रहाणे जवळपास 15 महिन्यांनंतर भारतीय संघात जागा मिळवण्यात यशस्वी झाला आहे. तो जानेवारी 2022पासून भारतीय संघातून बाहेर होता. अशात रहाणेला संघात परत घेतल्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा 34 वर्षीय असून तो मागील एक दशकापासून भारतीय कसोटी संघातील महत्त्वाचा भाग राहिला आहे. खराब प्रदर्शनामुळे तो जवळपास एक वर्ष बाहेर राहिला. मात्र, त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि त्यानंतर आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. अशात रहाणेला अखेर संघात पुन्हा स्थान मिळाले आहे. आता क्रिकेट जाणकारांपासून ते चाहत्यांपर्यंत अनेकजण त्याच्या पुनरागमनावर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.
एका युजरने ट्वीटमध्ये रहाणेचा आयपीएल 2023मध्ये चेन्नई सुपर किंग्स जर्सीतील फोटो शेअर केला. तसेच लिहिले की, अजिंक्य रहाणेचे कसोटी संघात पुनरागमन.” या युजरने ट्वीटमध्ये जो फोटो वापरला आहे, त्यावर असे लिहिले आहे की, “परमेश्वरा अपयशही दे, पण कमबॅक रहाणेसारखंच दे.”
Ajinkya Rahane is back in the test squad 🔥 pic.twitter.com/34s6mliHtv
— narsa. (@rathor7_) April 25, 2023
दुसऱ्या एकाने ट्वीट करत लिहिले की, “इतर फलंदाजांनी शानदार कामगिरी करत ऑरेंज कॅप घेतली, पण रहाणेला निळी कॅप मिळाली.”
Other IPL batsmen get orange cap for their performance. Rahane got blue cap pic.twitter.com/nYu5ayLZvB
— Sagar (@sagarcasm) April 25, 2023
प्रसिद्ध क्रीडा पत्रकार आणि समालोचक हर्षा भोगले यांनीही महत्त्वाचे ट्वीट केले. त्यात त्यांनी लिहिले की, “मी डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारताच्या संघाबद्दल विचार करत होतो आणि लोकांशी गप्पा मारत होतो. मी त्याकडे कोणत्या मार्गाने पाहिले तरी, मी या संघात शून्य होतो. हे सूचित करते की, तेथे बरेच पर्याय नव्हते. रहाणेचे पुनरागमन हेच महत्त्वाचे बोलणे आहे. तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे, टी20 मध्ये स्लॉगिंग नाही, सभ्य अव्वल दर्जाचा हंगाम, भरपूर अनुभव. एकल निवडीसारखे दिसते परंतु आशा आहे की, तो एक शक्तिशाली परतावा असेल.”
I had been thinking, and chatting to people, about India's squad for the WTC Final. And whichever way I looked at it, I was zeroing in on this team. That suggests there weren't too many choices. The only real talking point is the return of Rahane. Looks in good form, not slogging…
— Harsha Bhogle (@bhogleharsha) April 25, 2023
एका युजरने ट्वीट करत रहाणेच्या खांद्यावर सर्वांचे हात असलेला फोटो टाकला. तसेच, त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “डब्ल्यूटीसीमध्ये अजिंक्य रहाणेची निवड. आपल्याला राजा मिळाला.”
Ajinkya Rahane included in the WTC Final squad!! We'll Deserved King. 👑 pic.twitter.com/g8TDupE8Y0
— DIPTI MSDIAN ( 𝐃𝐡𝐨𝐧𝐢 𝐊𝐚 𝐏𝐚𝐫𝐢𝐯𝐚𝐫) (@Diptiranjan_7) April 25, 2023
Ajinkya Rahane included in the Indian team for WTC Final 2023.
Welcome back Rahane 🤞💪#AjinkyaRahane #wtcfinal #WTC2023 pic.twitter.com/X4EAomVGaJ
— Ashutosh Srivastava 🇮🇳 (@sri_ashutosh08) April 25, 2023
Ajinkya Rahane in last 20 days:
•Comeback in IPL.
•Scored 61(27) in first match IPL 2023.
•209 runs, 52.3 ave, 199.05 SR.
•Best strike rate in this IPL.
•Man of the match award in this IPL.
•Selected in India's squad for WTC final.AJINKYA RAHANE, 2.0 NOW. INCREDIBLE. pic.twitter.com/sCPDizwaRY
— Tanuj Singh (@ImTanujSingh) April 25, 2023
Ajinkya Rahane is back in the test squad 🔥🔥 pic.twitter.com/rTfsOuGPMn
— Dennis❤️ (@DenissForReal) April 25, 2023
रहाणेची आयपीएल 2023मधील कामगिरी
विशेष म्हणजे, अजिंक्य रहाणे हा आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाकडून जबरदस्त कामगिरी करत आहे. रहाणेने आयपीएलमध्ये 5 सामन्यात 52.25च्या सरासरीने आणि 199.05च्या स्ट्राईक रेटने 209 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, हा स्ट्राईक रेट आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळण्यात आलेल्या सामन्यांमध्ये इतर खेळाडूंपेक्षा सर्वाधिक आहे. कदाचित याच कामगिरीच्या जोरावर रहाणेने भारतीय संघात आपली जागा मिळवली आहे. (cricketer ajinkya rahane returns in team india test squad social media reaction wtc final 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिग्गजाचे पुनरागमन, तर हुकमी एक्का संघातून बाहेर; पाहा WTC Finalसाठी निवडलेली 15 सदस्यीय टीम इंडिया
आता कांगारुंची खैर नाही! तुफान फॉर्ममध्ये असलेल्या रहाणेचे टीम इंडियात पुनरागमन, 1 वर्षानंतर मिळाली संधी