भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात कसोटी, वनडे आणि टी20 मालिका खेळली जाईल. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला विश्रांती दिली जाऊ शकते. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने दिलेल्या पराभवाच्या धक्क्यामुळे रोहित नेटकऱ्यांसह दिग्गज क्रिकेटपटूंच्याही निशाण्यावर आहे. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील रोहितच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अशात चर्चा होत आहे की, रोहितला वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान विश्रांती दिली जाऊ शकते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, एका निवडकर्त्याची इच्छा आहे की, रोहित शर्मा (Rohit Sharma) याने वेस्ट इंडिज दौऱ्यातील काही सामन्यांसाठी विश्रांती घ्यावी. असेही म्हटले जात आहे की, रोहित आयपीएल आणि डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यानंतर थकल्यासारखा वाटत होता. त्याला कसोटी किंवा 8 सामन्यांच्या वनडे आणि टी20 मालिकेतून बाहेर ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, निवडकर्ते रोहितशी संवाद साधूनच अंतिम निर्णय घेतील.
रहाणेला मिळू शकते कर्णधारपद
रोहित शर्मा वेस्ट इंडिज दौऱ्याचा भाग झाला नाही, तर संघाचे नेतृत्व करण्यासाठी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कसोटी कसोटी कर्णधाराच्या रूपात चांगला पर्याय ठरेल. कसोटी कर्णधाराच्या रूपातही रहाणेची आकडेवारी शानदार आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात दोन कसोटी सामने जिंकले होते. तसेच, मालिकाही आपल्या नावावर केली होती. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातही रहाणेने आपल्या बॅटमधून सर्वांचे लक्ष वेधले होते. रहाणेने पहिल्या डावात 89 आणि दुसऱ्या डावात 46 धावांचा पाऊस पाडला होता.
भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा
भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 सामन्यांच्या टी20 मालिका खेळणार आहे. हा दौरा 12 जुलैपासून ते 13 ऑगस्टपर्यंत चालेल. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. या संघात यशस्वी जयसवाल, रिंकू सिंग यांसारख्या युवा खेळाडूंना संधी मिळणे निश्चित मानले जात आहे. (cricketer ajiykya rahane is set to lead team india on west indies tour)
महत्वाच्या बातम्या-
रणजीत 7 सामन्यात 50 विकेट्स, तरीही दुलीप ट्रॉफीत मिळाली नाही संंधी; गोलंदाज म्हणाला, ‘भारतात…’
धोनीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! 2011 वर्ल्डकप फायनलमध्ये युवराजआधी फलंदाजीला येण्याचा केला खुलासा