ऍशेस मालिका 2023 रंगतदारपणे पार पडत आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील सामन्यात दरदिवशी रोमांचक घडामोडी घडताना दिसत आहेत. यामध्ये काही वादग्रस्त घटनाही पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये आता ऍशेस मालिकेतून मोठी बातमी समोर येत आहे. जॉनी बेअरस्टो याला यष्टीचीत करून इंग्लिश मीडियामध्ये व्हिलन ठरलेला ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरे सध्या चर्चेत आहे. त्याच्यावर लीड्स येथील एका न्हाव्याला केस कापल्याचे पैसे न दिल्याचा आरोप केला गेला आहे. मात्र, हा आरोप संघसहकारी स्टीव्ह स्मिथ याने खोडून काढला आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) संघातील लॉर्ड्स कसोटीच्या अखेरच्या दिवशी ऍलेक्स कॅरे (Alex Carey) याने जॉनी बेअरस्टो याला यष्टीचीत बाद केले होते. त्यावर मोठा वाद झाला होता. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्यापासून ते इतर खेळाडू, मीडिया आणि इंग्लंडच्या चाहत्यांनी त्याच्यावर खिलाडूवृत्तीचा अपमान केल्याचा आरोप लावला.
या घटनेचे सावट आता लीड्स कसोटीतही कायम आहे. या कसोटीत कॅरेसह ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंना इंग्लिश चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. इकडे लीड्स कसोटी सामना रोमांचक वळणावर आहे, तर दुसरीकडे असे काही घडले की, पुन्हा एक वाद समोर आला आहे. या वादाने पुन्हा एकदा इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला आमने-सामने उभे केले आहे.
झाले असे की, लीड्समधील एका न्हाव्याने आरोप लावला आहे की, ऍलेक्स कॅरे याने त्याच्या दुकानात केस कापले, पण त्याने पैसे दिले नाहीत. याचा खुलासा सर्वप्रथम इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूक याने कसोटीच्या दुसऱ्या दिवशी समालोचन करताना सांगितले होते की, कॅरेने लीड्सच्या एका न्हाव्याच्या दुकानात केस कापले, पण पैसे दिले नाहीत.
A shocking revelation about Australia’s Alex Carey! ????#BBCCricket #Ashes pic.twitter.com/fzljpIdHho
— Test Match Special (@bbctms) July 6, 2023
द सन या ब्रिटिश वृत्तपत्रानुसार, लीड्सच्या एका बार्बरकडे डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा आणि ऍलेक्स कॅरे हेअरकट करण्यासाठी आले होते. वृत्तानुसार, यामध्ये वॉर्नर आणि ख्वाजा यांनी हेअरकटचे पैसे दिले. मात्र, कॅरेने आपले पैसे दिले नाहीत. बार्बरने कॅरेला सोमवारपर्यंत 30 पाऊंड म्हणजेच जवळपास 3000हून अधिक रुपये देण्याची चेतावणी दिली आहे.
स्मिथने सांगितलं संपूर्ण सत्य
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे प्रत्येकजण खेळ सुरू होण्याची वाट पाहत होता. अशात हा वाद अजून वाढत गेला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने थ्रेड (Thread) या सोशल मीडिया ऍपवर एक पोस्ट शेअर करत या आरोपांचे खंडन केले. त्याने स्पष्ट केले की, “आम्ही लंडनमध्ये आल्यापासून ऍलेक्स कॅरेने कोणताही हेअरकट केला नाहीये.” यावेळी त्याने द सन वृत्तपत्राला टॅग करत म्हटले की, “योग्य तथ्यांची मिळवा.”
Steve Smith’s thread on threads. pic.twitter.com/l5sn3Fibmv
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 8, 2023
Post by @steve_smith49View on Threads
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन मीडियाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका प्रवक्त्याच्या हवाल्यावरून सांगितले की, ऑस्ट्रेलिया संघाचा इतर कोणतातरी खेळाडू हेअरकट करण्यासाठी गेला होता. तसेच, त्याने आंतरराष्ट्रीय ट्रान्सफरचा वापर करत पैसे भरले होते.
विशेष म्हणजे, जॉनी बेअरस्टो प्रकरणानंतर दोन्ही देशांचे पंतप्रधान आमने-सामने आले होते. यानंतर आता दोन्ही देशांची मीडियादेखील आमने-सामने आली आहे. (cricketer alex carey haircutting controversy teammate steve smith reveals truth leeds test ashes series)
महत्वाच्या बातम्या-
वॉर्नरच्या Thread पोस्टवर कमिन्सने सल्ला देताच लोटपोट झाला रिषभ पंत; म्हणाला, ‘भावा…’
लीड्समधील न्हाव्याचा कांगारू खेळाडूवर मोठा आरोप! म्हणाला, ‘त्याने पैसे देण्याचे वचन दिले पण…’