अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपलेल्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या १५व्या हंगामातून मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आयपीएलच्या या हंगामात नव्याने सामील झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाबाबत आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीमुळे आयपीएल २०२२मधून बाहेर पडला होता. त्यामुळे आता त्याच्या जागी नवीन खेळाडूची वर्णी लागली आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू टाय आहे. (Cricketer Andrew Tye joins Lucknow Super Giants as a replacement for injured Mark Wood)
झाले असे होते की, या महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मार्क वूडला (Mark Wood) कोपराची दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएल २०२२मधून (IPL 2022) बाहेर पडला होता. अशात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघ नवीन खेळाडूच्या शोधात होता. आता त्यांनी अँड्र्यू टायला (Andrew Tye) मार्क वूडच्या जागी संघात सामील केले आहे.
लखनऊ संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “आता आपली बारी आहे, कारण आमच्या संघात अँड्र्यू टाय भारी आहे.”
Ab apni baari hai, kyuki humari team mein Andrew Tye bhaari hai! #AbApniBaariHai 💪@aj191
📸: Cricket Australia#LucknowSuperGiants #TataIPL #IPL2022 #UttarPradesh #Lucknow #LSG2022 #CricketUpdates #CricketNews pic.twitter.com/KNiL0oyO3m— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 23, 2022
लखनऊ संघात सामील झालेल्या टायबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ३२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. याव्यतिरिक्त त्याने आयपीएलमध्ये २७ सामनेही खेळले आहेत. हे सामने खेळताना त्याने ४० विकेट्सही आपल्या खिशात घातल्या आहेत. टायबद्दल खास माहिती अशी की, तो १ कोटी रुपयांमध्ये लखनऊ संघात जोडला गेला आहे.
लखनऊ संघाचा हा पहिलाच हंगाम आहे. या हंगामातील पहिला सामना २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला जाणार आहे. लखनऊ संघाच्या सामन्याविषयी बोलायचं झालं, तर आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेला दुसरा संघ गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांचा पहिला सामना २८ मार्च रोजी वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंत आणि धोनीच्या तुलनेवर शेन वॉटसनची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘या’ बाबतीत दोघेही एकसारखे
मुंबईची सलामी जोडी ते सूर्यकुमारची उपलब्धता, रोहितने आगामी आयपीएलबद्दल दिली महत्त्वाची माहिती