इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत सर्वात खराब फ्लॉप ठरत असलेला संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स. दिल्लीचा खेळाडू रिषभ पंत अपघातामुळे या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच बाहेर पडला होता. त्यानंतर दिल्ली संघाने स्पर्धेत 9 सामने खेळून फक्त 3 सामन्यात विजय मिळवला, तर उर्वरित 6 सामन्यात पराभव पत्करावा लागला. अशात आता दिल्लीचा दहावा आणि स्पर्धेचा 50वा सामना शनिवारी (दि. 6 मे) अरुण जेटली स्टेडिअमवर दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दिल्लीला तगडा झटका बसला आहे.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किया (Anrich Nortje) हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यापूर्वीच संंघाची साथ सोडून मायदेशी परतला आहे. नॉर्कियाचे मायदेशी परतण्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे सांगितले जात आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे ट्वीट
दिल्ली कॅपिटल्स संघाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. दिल्लीने ट्वीटमध्ये लिहिले की, “दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्कियाला वैयक्तिक कारण देत शुक्रवारी रात्री उशिरा दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना व्हावे लागले. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध आज सायंकाळी होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध राहणार नाही.”
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥 𝐒𝐭𝐚𝐭𝐞𝐦𝐞𝐧𝐭
Owing to a personal emergency, Delhi Capitals fast bowler Anrich Nortje had to leave for South Africa late on Friday night. He will be unavailable for this evening’s game against Royal Challengers Bangalore. pic.twitter.com/lig7mfgLan
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 6, 2023
गुणतालिकेमध्ये तळात
आयपीएलच्या चालू हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघ आपल्या खराब प्रदर्शनामुळे गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. या हंगामात दिल्लीच्या पदरात फक्त 3 विजय पडले आहेत. अशात नॉर्कियासारखा महत्त्वाचा गोलंदाज मोठ्या सामन्यातून बाहेर पडणे हा दिल्लीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. नॉर्कियाच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने स्पर्धेत आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला 8.91च्या इकॉनॉमी रेटने 7 विकेट्स घेण्यात यश आले आहे.
संघात परतणार का?
आयपीएल 2023मध्ये 6.50 कोटी रुपयांमध्ये संघात सामील झालेला एन्रीच नॉर्किया पुन्हा संघाशी कधी जोडला जाईल, हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि अनुभवी गोलंदाज ईशांत शर्मा या खेळाडूंवरील जबाबदारी वाढली आहे. (cricketer anrich nortje returned back to south africa following a personal emergency will miss match against rcb)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेपॉकच्या महायुद्धात नाणेफेक धोनीच्या बाजूने! मुंबईला फलंदाजीचे आमंत्रण, तिलक बाहेर
गंभीरसोबत झालेल्या वादानंतर विराटने थेट बीसीसीआयला लिहिले पत्र, म्हणाला, “माझ्यावर केलेली कारवाई…”