पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंड वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी राष्ट्रीय संघाची घोषणा केली आहे. त्यामध्ये युवा खेळाडू आजम खानची टी20 मालिकेसाठी देखील संघात निवड झाली आहे. आजम खान हा पाकिस्तानचे माजी खेळाडू मोइन खान यांचा सुपुत्र आहे. आतापर्यंत आजम खानने छोट्या कारकिर्दीत 36 टी20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानी 157.41 च्या सरासरीने 743 धावा काढल्या. पाकिस्तान सुपर लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची पाकिस्तान संघामध्ये निवड झाली आहे.
संघात निवड झाल्यानंतर त्याने प्रतिक्रिया दिली की, ‘मी नाश्ता करत असताना नबील भाईने माझी पाकिस्तान टी-20 संघात माझी निवड झाल्याचे सांगितले. मला पहिल्यांदा असे वाटले की ते माझी चेष्टा करत आहे. परंतु त्यानंतर मी नाश्त्यावरून उठून सरळ माझ्या वडिलांकडे गेलो. हे सर्व माझ्यासाठी एका चित्रपटासारखा होता. हा एक माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. मला इतक्या लवकर माझी निवड होईल असे वाटले नव्हते. मला आनंद वाटत आहे की माझ्या मागील एक वर्षाची मेहनत कामी आली.’
आजम खानने लंका प्रिमियर लीगमध्ये ही आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. आजम खान लंका प्रीमियर लीगमध्ये गॉल ग्लैडिएटर्सकडून खेळत होता. त्याचे उंच उंच मारलेले शॉट प्रेक्षकांना खूप आवडत होते. पाकिस्तान संघामध्ये निवड झाल्याबद्दल त्यानी सांगितले की, ‘मी स्वप्न बघतोय असा मला वाटत. मला देशासाठी खेळायला मिळावे हे माझं ध्येय होतं. मी सर्वांचे आभार मानतो.’
पाकिस्तानचा टी२० संघ – बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अरशद इक्बाल, आजम खान, फहीम अशरफ, फखर जमान, हैदर अली, हॅरिस रऊफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीझ, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), शाहीन शाह आफ्रिदी, शर्जील खान आणि उस्मान कादीर.
महत्त्वाच्या बातम्या –
एकाचं पोट दुखलं, दुसऱ्याची गोलंदाजी नडली; क्रिकेट इतिहासातील एकमेव षटक, ज्यात तिघांनी केली गोलंदाजी
‘रोहित भाई आला आणि त्याने मला…,’ सिराजने केली तक्रार; पाहा विमान प्रवासातील तो प्रसंग