---Advertisement---

‘कधीच विचार केला नव्हता हॉटेलमध्ये माझ्यासोबत इतके दिग्गज असतील’, २००८ आयपीएल गाजवलेल्या खेळाडूचा आठणींना उजाळा

On: शनिवार, जून 5, 2021 3:00 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगने गेल्या १३ वर्षात मोठे यश मिळाले आहे. या स्पर्धेत दरवर्षी अनेक दिग्गज खेळाडू खेळत असतात. या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात पाकिस्तानी खेळाडूही खेळले होते. मात्र, नंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील संबंध बिघडल्याने पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास निर्बंध घालण्यात आले. पण या स्पर्धेचा पहिला हंगाम एका पाकिस्तानी गोलंदाजाने गाजवला होता, तो गोलंदाज म्हणजे सोहेल तन्वीर. आता त्याने त्याचा आयपीएल खेळण्याचा अनुभव सांगितला आहे.

तन्वीरने सांगितले की तो जेव्हा आयपीएल खेळण्यासाठी भारतात आला, तेव्हा एकत्र अनेक दिग्गज खेळाडूंना पाहून हैराण झाला होता. आयपीएलच्या पहिल्या हंगामात सोहेल तन्वीर राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. त्याने राजस्थानकडून खेळताना भेदक गोलंदाजी केली होती. राजस्थान रॉयल्सने शेन वार्नच्या कर्णधारपदाखाली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.

या हंगामात सोहेल तन्वीरने ११ सामन्यात २२ गडी बाद करून ‘पर्पल कॅप’चा खिताब जिंकला होता. दरम्यान, एका सामन्यात त्याने १४ धावा देऊन ६ गडी सुद्धा मिळवले होते. त्याचा हा विक्रम कित्येक वर्ष कायम राहिला होता.

‘माई मास्टर क्रिकेट कोच’ या यु-टूब चॅनल सोबत गप्पा मारताना सोहेल तन्वीरने आपल्या आयपीएलच्या जुन्या गोष्टींना उजाळा दिला. सोहेल तन्वीर सांगतो की, ‘ज्या वेळेस २००८ला मी पहिल्यांदा आयपीएलसाठी गेलो, तेव्हा मी खूप युवा आणि अननुभवी खेळाडू होतो. त्या वेळेस मी पाकिस्तानसाठी सुद्धा जास्त सामने खेळलो नव्हतो. त्यावेळेस व्यावसायिक सामने खूप कमी प्रमाणात खेळले जात असे. त्यामुळे मला आयपीएलबद्दल इतकी माहिती नव्हती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने सांगितला की तुम्हाला भारतात आयपीएल  खेळण्यास जायचे आहे.’

सोहेल तन्वीर पुढे बोलतो की, ‘मी जेव्हा आयपीएलसाठी पोहोचलो, तेव्हा जगतील सर्वच महान खेळाडू तिथे उपस्थित होते. तिकडे जगभरातले दिग्गज गोलंदाज होते आणि हा क्षण पाहून मी हैराण झालो. मी कधीही असा विचार केला नव्हता की एका हॉटेलमध्ये सगळेच दिग्गज खेळाडू एका वेळेस माझा सोबत असतील’.

सोहेल तन्वीरने आपल्या आयपीएलच्या कारकिर्दीत एकूण ११ सामने खेळले. त्यात त्याने १२.०९च्या सरासरीने २२ गडी बाद केले. सोहेल तन्वीर आयपीएलव्यतिरिक्त सीपीएल, बीपीएल आणि पीएसएल या व्यवसायिक लीगमध्येही खेळला. सोहेलने पाकिस्तान संघाचे ६० एकदिवसीय, ४ कसोटी आणि ५७ टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. सोहेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १३० गडी बाद केले. सोहेलने २००७च्या टी -२० विश्वचषकात भरीव अशी कामगिरी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘रोहित भाई आला आणि त्याने मला…,’ सिराजने केली तक्रार; पाहा विमान प्रवासातील तो प्रसंग

‘मी कर्णधारपदापासून दूरच बरा’, राशिद खानने सांगितले नेतृत्वपद नाकारण्याचे कारण

भारतीय संघाचे ‘ठाकूर आणि गब्बर’; शिखर धवनने शेअर केलेला ‘हा’ फोटो जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---