---Advertisement---

‘मला आधीपासूनच माहिती होते, मी वर्ल्डकप खेळणार, पण…’, स्टोक्सचा खळबळजनक खुलासा

Ben-Stokes
---Advertisement---

इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स याने अलीकडेच वनडे क्रिकेटमधील निवृत्तीतून माघार घेतली आहे. स्टोक्सच्या या निर्णयाने क्रिकेटप्रेमींचा आनंदही गगनात मावेनासा झाला. स्टोक्सने पुनरागमन जबरदस्त खेळीही साकारली. आता त्याने निवृत्तीतून माघार घेण्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. स्टोक्सनुसार, त्याला आधीपासूनच माहिती होते की, तो यावर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकात खेळणार आहे.

बेन स्टोक्स (Ben Stokes) याने कामाच्या ताणामुळे मागील वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यावेळी तो म्हणाला होता की, तो वनडे क्रिकेटमध्ये त्याचे 100 टक्के योगदान देत नव्हता. त्यामुळे त्याने या क्रिकेटप्रकारातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्टोक्स आता पुन्हा एकदा वनडेत परतला आहे. त्याने जबरदस्त प्रदर्शनही करताना दिसत आहे.

काय म्हणाला स्टोक्स?
स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्ध 182 धावांची शानदार खेळी साकारून संघाला 181 धावांनी विजय मिळवून दिला. या खेळीनंतर तो म्हणाला, “मला आधीपासूनच माहिती होते की, मी या सामन्यांमध्ये आणि आगामी विश्वचषकातही खेळणार आहे. मात्र, मीडियाचे लक्ष विचलित करण्यासाठी मी त्यावेळी काही सांगितले नव्हते.”

स्टोक्सची 182 धावांची शानदार खेळी
खरं तर, स्टोक्सने इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात 124 चेंडूत 9 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने 182 धावांची खेळी साकारली होती. ही खेळी त्याच्या वनडे कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी आहे. याव्यतिरिक्त ही इंग्लंड संघाकडून कोणत्याही फलंदाजीने केलेली वनडेतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीही आहे.

या सामन्यात इंग्लंडने स्टोक्सच्या शानदार खेळीच्या जोरावर 48.1 षटकात सर्वबाद 368 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ 39 षटकात 187 धावांवरच सर्वबाद झाला. त्यामुळे त्यांना 181 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. स्टोक्सला या खेळीसाठी सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. आता त्याने या खेळीने विश्वचषकातील इतर संघांसाठी धोक्याची घंटी वाजवली आहे. (cricketer ben stokes reacts on his decision to play in world cup 2023)

हेही वाचा-
नाद करा पण रिंकूचा कुठं! 180पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने पाडला धावांचा पाऊस, संघाचा दणदणीत विजय
पृथ्वी शॉबाबत धक्कादायक ब्रेकिंग! कोसळलाय संकटांचा डोंगर, लगेच वाचा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---