अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या यावेळी ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेत पहिल्यांदाच 400 धावांचा टप्पा पार करण्यात यश मिळवले. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या धावसंख्येत सिंहाचा वाटा उचलण्याचे काम उस्मान ख्वाजा याने केले. त्याने यादरम्यान 422 चेंडूंचा सामना करत 180 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 21 चौकारही मारले. असे असले, तरीही त्याला बाद करण्यात प्रभारी कर्णधाराचा हात होता. तो कसा, तर चला जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी उतरलेल्या उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने सहाव्या सत्रापर्यंत टिच्चून फलंदाजी केली. तो या सामन्यात चांगल्या लयीत फलंदाजी करत होता आणि भारतीय गोलंदाजीची पिसे काढत होता. दुसऱ्या बाजूला सात विकेट्स पडले होते, परंतु ख्वाजा मैदानावर टिकून होता. रोहित शर्मा (Rohit Sharma) याने त्याच्या सर्व रणनीती वापरूनही ख्वाजाला बाद करता येत नव्हते. दरम्यान, रोहित चहापानाच्या काही वेळानंतर मैदानावर परतला. यावेळी त्याच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्या खांद्यावर आली. पुजाराने अक्षर पटेल (Axar Patel) याला गोलंदाजी करण्यास सांगितले.
यावेळी अक्षरने 147व्या षटकाचा पहिलाच चेंडू ख्वाजाच्या पायावर मारला. पंचांनी यावेळी नाबाद दिले, परंतु पुजाराने लगेच रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये दिसले की, पुजारा बाद होता. अशाप्रकारे रोहितच्या अनुपस्थितीत पुजाराने भारताला विकेट घेऊन दिली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खालच्या फळीतील फलंदाज क्रीझवर आले. मात्र, त्यांना जास्त धावा करता आल्या नाहीत. यावेळी ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपुष्टात आला.
https://twitter.com/BCCI/status/1634119645744570370
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना उस्मान ख्वाजा यानेच सर्वाधिक धावा केल्या. त्याने 180 धावांचे योगदान दिले. त्याने कॅमरून ग्रीन याच्यासोबत 208 धावांची विक्रमी भागीदारी रचली. ग्रीननेही 114 धावा करत पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्यांच्याव्यतिरिक्त टॉड मर्फी याने 41 धावा केल्या. तसेच, कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यानेही 38 धावांचे योगदान दिले. इतर एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारतीय संघाने 10 षटकात एकही विकेट न गमावता 36 धावा केल्या. यावेळी सलामीवीर शुबमन गिल (18) आणि रोहित शर्मा (17) हे खेळाडू नाबाद आहेत. (cricketer cheteshwar pujara excellent review for usman khawaja out in ind vs aus 4th test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इथे-तिथे, यहां-वहां, फक्त धोनीचीच हवा! कट्टर फॅनने लग्नाच्या पत्रिकेवर छापला माहीचा फोटो, पाहिला का?
एका दर्शकामुळे थांबवला गेला भारत ऑस्ट्रलिया सामना, मजेदार प्रसंगाचा व्हिडिओ होतोय व्हायरल